भावाच्या अंत्यविधीला गेलेल्या अंगणवाडी शिक्षिकेचे घर फोडले; लाखोंचा ऐवज केला लंपास

By रूपेश हेळवे | Updated: October 1, 2023 16:58 IST2023-10-01T16:57:41+5:302023-10-01T16:58:13+5:30

याप्रकरणी रानडे यांनी फिर्याद दिली असून अद्याप चोरावर गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेचा तपास पोलीस करत आहेत.

robbery in the anganwadi teacher house in solapur | भावाच्या अंत्यविधीला गेलेल्या अंगणवाडी शिक्षिकेचे घर फोडले; लाखोंचा ऐवज केला लंपास

भावाच्या अंत्यविधीला गेलेल्या अंगणवाडी शिक्षिकेचे घर फोडले; लाखोंचा ऐवज केला लंपास

सोलापूर : भावाच्या अंत्यविधीला गेलेल्या अंगणवाडी शिक्षिकेचे घरात चोरी झाली. ही घटना रविवारी सकाळच्या सुमारास इंदिरानगर, मंद्रुप (ता.द.सोलापूर) येथे घडली. जगदेवी भांगांना रगडे (वय ४५, रा. इंदिरानगर, मंद्रुप, ता. द. सोलापूर) या अंगणवाडी शिक्षिका आहेत.

 त्याचे इंदिरानगर येथे घर आहे. त्या २० सप्टेंबर रोजी भावाच्या अंत्यविधीसाठी कुटुुंबासोबत गेल्या होत्या. ३० सप्टेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी ३० हजाराचे एक सोन्याचे मिनी गंठण व सोन्याची १० ग्रॅमची ठूशी, ३० हजाराचे अंगड्या व लहान मुलांच्या अंगठ्या, ६० हजाराचे सोन्याचे मिनी गंठण, कानातील सोन्याची फुले दोन जोड, ७५०० रूपयाचे पायातील चांदीचे पैंजण, ६६ हजार रूपये रोख रक्कम अज्ञाताने चोरल्या. या घटनेची नोंद रविवारी सकाळी मंद्रुप पोलिस ठाण्यात झाली आहे. 

याप्रकरणी रानडे यांनी फिर्याद दिली असून अद्याप चोरावर गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेचा तपास पोलीस करत आहेत.
 

Web Title: robbery in the anganwadi teacher house in solapur