पालखी सोहळ्यातील दिंडीवर फलटणमध्ये दरोडा; वारकऱ्यांना जमावाने मारहाण करून केली चोरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2025 19:01 IST2025-07-02T19:00:05+5:302025-07-02T19:01:41+5:30

सोलापुरात पालखी सोहळ्यातील एका दिंडीवर

Robbery at the palkhi sohala dindi at soalpur Warkars were beaten and stolen | पालखी सोहळ्यातील दिंडीवर फलटणमध्ये दरोडा; वारकऱ्यांना जमावाने मारहाण करून केली चोरी

पालखी सोहळ्यातील दिंडीवर फलटणमध्ये दरोडा; वारकऱ्यांना जमावाने मारहाण करून केली चोरी

Solapur Palkhi Sohala: श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील दिंडी क्रमांक १४१ वर चोरट्यांनी दरोडा टाकत वारकऱ्यांना मारहाण केली. ही घटना फलटण हद्दीत घडल्याची माहिती दिंडीतील सहभागी वारकऱ्यांनी सोलापूर जिल्ह्यात पालखीचे आगमन झाल्यानंतर 'लोकमत'शी बोलताना दिली

श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आळंदीहून पंढरपूरच्या दिशेने येत होता. पालखी सोहळा फलटण हद्दीत मुक्कामी असताना पालखी क्रमांक १४१ वर चोरट्याने दरोडा टाकत वारकऱ्यांना मारहाण केली. यावेळी पालखीतील ऐवज चोरीला गेल्याचे सांगण्यात आले. मागील १५ ते २० वर्षापूर्वीही अशा घटना घडत असल्याचे पालखी सोहळ्याचे प्रमुख रामभाऊ चौधरी यांनी सांगितले.

जाणून घ्या कशी घडली घटना... 

दिंडी क्रमांक १४१ ही फलटण मुक्कामी असताना मध्यरात्रीच्या सुमारास चार ते पाच चोरटे आले. याच वेळी दिंडीतील काही लोक जागे झाले आणि त्यांनी त्यांना पकडून मारहाण केली. त्यानंतर त्या चोरट्यानी वीस ते पंचवीस लोकांचा जमाव आणून दिंडीतील वारकऱ्यांना मारहाण करून ऐवज चोरून नेला, अशी माहिती दिंडीतील सहभागी वारकऱ्यांनी दिली.
 

Web Title: Robbery at the palkhi sohala dindi at soalpur Warkars were beaten and stolen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.