शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

चौकशीसाठी सेवानिवृत्त शिक्षणाधिकाऱ्यांचे खेटे

By admin | Updated: June 15, 2014 00:23 IST

जिल्हा परिषद: सूर्यवंशी व आंबेडकर यांची चौकशी

सोलापूर: सेवेत असताना नियम डावलून वाट्टेल ते केलेल्या शिक्षणाधिकाऱ्यांना आता खेटे मारण्याची वेळ आली आहे. खुर्चीवर असताना लोकांना तासन्तास ताटकळत ठेवणाऱ्या सेवानिवृत्त शिक्षणाधिकाऱ्यांना चौकशीसाठी आता ताटकळावे लागत आहे. सरकारी सेवा बजावताना चुकीच्या पद्धतीचे कामकाज करणे नक्कीच अडचणीचे ठरणारे असते. परंतु काही अधिकारी मोहापायी अशा फाईलवर सुट्टीच्या दिवशीही सह्या करतात. नियमाप्रमाणे असणाऱ्या फाईल निकाली काढण्यात कर्मचाऱ्यांना रस नसतो. नियमाच्या फाईलवर सह्या करण्यासाठी अधिकाऱ्यांचे हात थरथर कापतात. परंतु बेकायदेशीर कामाच्या फाईल कधी हातावेगळ्या होतात ते समजूनही येत नाही. असाच प्रकार माध्यमिकचे तत्कालीन शिक्षणाधिकारी महादेव आंबेडकर यांच्याबाबत झाला आहे. त्यांनी कार्यालयातील कनिष्ठ लिपिकाला हाताशी धरुन केवळ लिपिकाच्या सहीवर आपली सही करुन मान्यता दिल्या होत्या. त्यांनी दिलेल्या मान्यतेबाबत मोठ्या प्रमाणावर तक्रारी आल्याने चौकशी सुरू झाली आहे. चौकशीला बोलावल्याने ते शुक्रवारी जि.प. शिक्षण विभागात आले होते. त्याप्रमाणे प्राथमिकचे तत्कालीन शिक्षणाधिकारी आबासाहेब सूर्यवंशी हेही बुधवार व गुरुवार असे दोन दिवस शिक्षण विभागात चौकशीच्या कामासाठी ठिय्या मारुन होते. शालेय पोषण आहार योजनेचा तांदूळ पोहोच न केलेल्या ठेकेदाराला बिल देण्यासाठी सूर्यवंशी यांनी मदत केल्याचे प्रकरण चौकशीसाठी सुरू आहे. नियमात असलेल्या कामासाठी पदाधिकारी व जनतेने कितीही आदळाआपट केली तरी दखल न घेणाऱ्या अधिकाऱ्यांनी मोहापायी पाहिजे त्या फाईल निकाली काढल्या. आता चौकशीच्या कामासाठी त्यांना ताटकळत बसावे लागत आहे.-------------------------------साक्षीदाराच्या साक्षी नोंदणीचे काम सुरू आहे. आंबेडकरांच्या साक्षीदारांच्या साक्षी पूर्ण झाल्या. सूर्यवंशी यांच्या साक्षीदाराच्या साक्षी सुरू आहेत. साक्षीदाराला पत्रच गेली नसल्याने साक्षीचे काम पूर्ण होऊ शकले नाही. जुलैमध्ये पुढील सुनावणी ठेवली आहे.- बी.एस.हंगेचौकशी अधिकारी