सोलापूर जिल्हा परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावरुन बळीराम साठेंना हटवा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2020 12:17 PM2020-09-10T12:17:13+5:302020-09-10T12:20:15+5:30

जिल्हा काँग्रेसच्या बैठकीत ठराव; दूध संघाच्या निवडीचे पडसाद

Remove Baliram Sathe from the post of Leader of Opposition in Solapur Zilla Parishad | सोलापूर जिल्हा परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावरुन बळीराम साठेंना हटवा 

सोलापूर जिल्हा परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावरुन बळीराम साठेंना हटवा 

googlenewsNext
ठळक मुद्देकाँग्रेस भवनमध्ये प्रकाश पाटील यांच्या उपस्थितीत जिल्हा काँग्रेस कमिटीची बैठक झालीराष्ट्रवादीच्या नेत्यांनी काँग्रेसच्या जिल्'ातील नेत्यांना विश्वासात घेतले नाहीजिल्हा परिषदेच्या राजकारणात काँग्रेसने राष्ट्रवादीला नेहमीच सहकार्य केले

सोलापूर : जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे अध्यक्षपद दिलीप माने यांना दिल्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये नव्या वादाला तोंड फुटले आहे. राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष बळिराम साठे यांना जिल्हा परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावरुन हटवण्यात यावे. या जागी काँग्रेसच्या सदस्याची निवड करावी असे पत्र काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील यांनी झेडपी अध्यक्ष अनिरुध्द कांबळे यांना पाठवले आहे. 

काँग्रेस भवनमध्ये प्रकाश पाटील यांच्या उपस्थितीत जिल्हा काँग्रेस कमिटीची बैठक झाली. कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे, अश्फाक बळोरगी, महिला जिल्हाध्यक्ष शाहीन शेख, सांगोला तालुक्याध्यक्ष दीपक पवार, मंगळवेढ्याचे नंदकुमार पवार, मोहोळचे अशोक देशमुख, माढ्याचे सौदागर जाधव, दक्षिण सोलापूरचे हरिश पाटील यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करताना प्रत्येक जिल्ह्यातील निर्णय समन्वयाने घेण्याचा निर्णय झाला. माजी आमदार दिलीप माने यांनी आमदार प्रणिती शिंदे यांच्या विरोधात निवडणूक लढविली. सुशीलकुमार शिंदे यांच्याविरोधात विधाने केली. त्या मानेंना राष्ट्रवादीचे नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हा दूध संघाचे अध्यक्षपद दिले. हे करण्यात बळिराम साठे यांनीही महत्त्वाची भूमिका बजावली.

राष्ट्रवादीच्या नेत्यांनी काँग्रेसच्या जिल्'ातील नेत्यांना विश्वासात घेतले नाही. जिल्हा परिषदेच्या राजकारणात काँग्रेसने राष्ट्रवादीला नेहमीच सहकार्य केले. आता या बदल्यात राष्ट्रवादीने काँग्रेसला सहकार्य करणे अपेक्षित आहे. झेडपीचे विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसच्या सदस्याला द्यावे, असे मत काही सदस्यांनी मांडले. कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे, अश्फाक बळोरगी यांनीही हाच सूर लावला. हे पत्र झेडपी अध्यक्षांना पाठवण्यात आले. 

पालक सचिव तत्काळ नेमा
जिल्हातील काँग्रेस कार्यकर्त्यांची कामे व्हावीत यासाठी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी एका पालक सचिवाची नेमणूक करावी. यात काँग्रेसचा माणूस असावा. काँग्रेसच्या अनेक पदाधिकाºयांनी जिल्हाधिकाºयांना विविध कामांची निवेदने दिली आहेत. या निवेदनांवर तत्काळ कार्यवाही व्हावी अशी मागणी जिल्हाधिकाºयांकडे करावी. उजनी धरण १०० टक्के भरले. जलसंपदा विभागाने हिळ्ळी बंधाºयापर्यंत पाणी सोडण्याचे नियोजन व्हावे. काँग्रेसला याबद्दलची माहिती द्यावी आदी ठरावही मांडण्यात आले.
पडद्यामागे काय घडतय?
झेडपीचा विरोधी पक्षनेता, पक्षनेता ठरवण्याचे अधिकार जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाला आहेत. झेडपी अध्यक्ष अनिरुध्द कांबळे हे मोहिते-पाटील गटाचे आहेत. मोहिते-पाटील आणि अजित पवार यांच्यात उघड संघर्ष आहे. मोहिते-पाटलांनी कांबळे यांना इशारा करावा. कांबळे यांनी बळीराम साठे यांना हटवून काँग्रेसच्या सदस्याची विरोधी पक्षनेतेपदी निवड करावी यासाठी काँग्रेसच्या नेत्यांनी हा डाव टाकला आहे. यावर राष्ट्रवादी काय करते याकडे लक्ष आहे.  ै

Web Title: Remove Baliram Sathe from the post of Leader of Opposition in Solapur Zilla Parishad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.