शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
2
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
3
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
4
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
5
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
6
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
7
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
8
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
9
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
10
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
11
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
12
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
13
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
14
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
15
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
16
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
17
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
18
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
19
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
20
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय

वाहन जप्ती मोहिमेमुळे बार्शीत बाहेर फिरणाºयांवर बसतोय वचक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2020 11:45 AM

बार्शीत मोकाट फिरणाºयांच्या २७० गाड्या जप्त; लॉकडाऊन काळात २१५२ वाहनांकडून पाच लाखांचा दंड वसूल

ठळक मुद्देपोलीस, आरोग्य, पालिकेची यंत्रणा सक्रीय मात्र महसूल यंत्रणा...विनाकारण  बाहेर पडणाºया ३२ जणांवर गुन्हेराजकीय नेते, व्यापाºयांच्या वाहनांवरही कारवाई

शहाजी फुरडे-पाटील

बार्शी: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासन सर्वतोपरी दक्षता घेत आहे़  या रोगाचे संक्रमण होऊ नये यासाठी संचारबंदी लागू केली. लोकांनी घरात बसावे यासाठी दुसºयांदा लॉक डाऊन करण्याचा निर्णय लोकांनी घरातच थांबावे अशा सूचना व आवाहन सर्वच जण करीत असताना देखील अद्यापही हौसे-नवसे व रिकामटेकडे  कांही तरी निमीत्त करुन बाहेर फिरतच आहेत.

त्यांना  पोलिसांच्या काठीचाही फरक पडेना म्हणून बार्शी शहर पोलिसांची गेल्या आठ ते दहा दिवसांपासून शहरात नाकेबंदी करुन विनाकारण बाहेर फिरणाºयांच्या गाड्या जप्त करण्याची मोहीम  एप्रिल महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यात   २७०  गाड्या जप्त केल्या तर २१५२  वाहनावर दंडात्मक कारवाई करून त्यांच्याकडन ४ लाख ९२ हजार ४०० रुपये दंड वसूल  केला आहे.

अद्याप रिकामटकडे बाहेर फिरतच आहेत़  सुरुवातीला पोलिसांनी अशांना चोपून काढले़ तरी देखील अत्यावश्यक सेवेचे कारण देत बाहेर फिरतच आहेत़  उपविभागीय अधिकारी डॉ. सिध्देश्वर भोरे यांचे मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक  अ‍ॅड़ संतोष गिरीगोसावी यांच्या नेतृत्वाखाली पांडे चौकात, हायवे स्टॉप, पोस्ट चौक, स्टॅण्ड चौक ,लाळेश्वर नाका, संकेश्वर उद्यान, परांडा रोड, येथे नाकोंदी केली यामध्ये पोलिीसांनी विनाकारण फिरणारे तसेच ज्यांच्याकडे लायसन्स नसणारे, नांरप्लेट नसणारे यांच्यावर कारवाई करुन त्यांच्या २७० गाड्या  कांही काळासाठी जप्त केल्या. तर एकूण २१५२ वाहनधारकाकडून सुमारे  पाच लाख रुपये दंड करुन सोडून देण्यात आले. या गाड्या लॉकडाऊन संपेपर्यंत संबंधीतांना देण्यात येणार नाहीत. गेली आठ दिवसात संचारबंदी लागू असताना विनाकारण घराबाहेर पडून मानवी जीवित व व्यक्तिगत सुरक्षा धोक्यात येईल असे कृत्य केल्याप्रकरणी एकूण ३२ गुन्हे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार एकुण ३२ गुन्हे दाखल झाले आहेत तर ११० प्रमाणे  एकूण २२ केसेस करून संबंधीतांना ताकीद देऊन सोडण्यात आले आहे. 

पोलीस, आरोग्य, पालिकेची यंत्रणा सक्रीय मात्र महसूल यंत्रणा...- लॉकडाऊन झाल्यापासून बार्शीचे पोलीस सक्रीय झाले आहेत़ त्यांनी खºया अर्थाने शहरात संचारबंदी ठेवण्याचे पुरेपूर प्रयत्न सुरुच आहेत़ गर्दी होत असेल तर त्यावर तोडगा काढण्यासाठी सातत्याने पोलीस स्टेशनमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ़ सिध्देश्वर भोरे व पो़नि़ संतोष गिरीगोसावी हे प्रयत्नशील आहेत़ त्यांना पालिका प्रशासनाची चांगली साथ मिळत आहे़ मात्र हा विषय महसूल प्रशासनाचा असताना देखील तहसीलदार प्रदीप शेलार हे मात्र कुठे आहेत असा प्रश्न निर्माण झाला आहे़ - प्रांताधिकारी हेमंत निकम हे देखील अधुनमधून बार्शीत येऊन परिस्थितीचा आढावा घेत आहेत़ आरोग्य विभागाचे काम देखी"ा संतोष जोगदंड यांच्या नेतृत्वाखाली नियोजनपूर्वक सुरु आहे़ 

विनाकारण  बाहेर पडणाºया ३२ जणांवर गुन्हे- मॉर्निंग वॉक करणारे तसेच विनाकारण बाहेर पडणारे एकूण ३२ गुन्हे बार्शी शहर पोलीस ठाण्यात दाखल  करण्यात आलेले यापुढे संचारबंदीच्या काळात कायदा न पाळणाºया तसेच विनाकारण रस्त्यावर फिरणाºयांवर कडक कारवाई सुरूच राहणार असल्याचे सांगत यासह शहरात अल्पवयीन मुले मुली वाहन चालवताना दिसल्यास त्यांच्या पालकांवर गुन्हे दाखल केले जाणार असल्याचे पोलीस  निरिक्षक अ‍ॅड़  संतोष गिरिगोसावी  यांनी सांगितले. 

राजकीय नेते, व्यापाºयांच्या वाहनांवरही कारवाई- या मोकाट फिरणाºया वाहन कारवाईमध्ये शहरातील एका राजकीय नेत्याच्या वाहनासह, नामांकित व्यापाºयाच्या देखील वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये पाच मोठ्या चारचाकी वाहनांचा समावेश आहे़ 

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसbarshi-acबार्शीRto officeआरटीओ ऑफीस