Rare Yoga; The wife took charge of the temple station from her husband | दुर्मिळ योग; पत्नीने घेतला पतीकडून मंद्रुप ठाण्याचा पदभार
दुर्मिळ योग; पत्नीने घेतला पतीकडून मंद्रुप ठाण्याचा पदभार

ठळक मुद्दे- मंद्रुप पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप धांडे यांची बदली- मंद्रुप पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी सोनाली पाटील-धांडे याची नियुक्ती- पोलीस अधिकारी पती-पत्नीचा झाला सत्कार

मंद्र्रुप : मंद्र्रुप पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप धांडे यांच्याकडील पदभार विधानसभानिवडणूक काळात सोनाली पाटील यांच्याकडे देण्यात आला आहे़ सोनाली पाटील-धांडे या संदीप धांडे यांच्या पत्नी आहेत. त्यांनी पती संदीप यांच्याकडून मंद्र्रुप पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक म्हणून पदभार स्वीकारला. त्यामुळे पत्नीने पतीकडून पदभार स्वीकारण्याचा दुर्मिळ योग पोलीस पाटील, पोलीस व पत्रकारांना पाहावयास मिळाला.

विधानसभा निवडणुकीचे बिगुल कधीही वाजू शकते. या पार्श्वभूमीवर अनेक पोलीस अधिकाºयांच्या बदल्या होत आहेत. 
याचाच भाग म्हणून वर्षभरापूर्वी संदीप धांडे यांनी अजित त्रिपुटे यांच्याकडून मंद्रुप पोलीस ठाण्याचे प्रभारी व सहायक पोलीस निरीक्षक म्हणून पदभार स्वीकारले होते. मात्र विधानसभा आचारसंहिते पूर्वी संदीप  धांडे यांची पोलीस अधीक्षक कार्यालयात कोर्ट पैरवी व दहशतवाद विरोधी पथक या ठिकाणी बदली झाली आहे़ शनिवारी पदभार व निरोप समारंभ कार्यक्रम पार पडला़ यावेळी दक्षिण सोलापूर पत्रकार संघाकडून पोलीस अधिकारी पती-पत्नीचा सत्कार करण्यात आला.
 


Web Title: Rare Yoga; The wife took charge of the temple station from her husband
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.