शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
2
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
3
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
4
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
5
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
7
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
8
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
9
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
10
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
11
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
12
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
13
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
14
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
15
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
16
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
17
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
18
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
19
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
20
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर

रामेश्वरची पहाट ठरली मृत्यूची वाट; नऊ महिन्यांच्या गिरीधरवरील पितृछत्र हरपले...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2020 11:59 AM

‘एमपीएससी’चा अभ्यास थांबला अन् फौजदार होण्याचे स्वप्नही राहिले अधुरेच...

ठळक मुद्देकोरोना नाकाबंदीत झालेल्या हत्येने त्याचा अभ्यासही थांबला अन् फौजदार होण्याची खूणगाठ कायमची सुटली गेली. नऊ महिन्याच्या गिरीधरवरील पित्याचे छत्र हरपल्याने आजी अन् मातेलाच आता पित्याचे प्रेम द्यावे लागणार

सोलापूर : हॅन्डबॉलपटू म्हणून ग्रामीण पोलीस दलात नोकरीचा श्रीगणेशा करणाºया रामेश्वर गंगाधर परचंडे यांनी ‘एमपीएससी’चा अभ्यास करून फौजदार होण्याची खूणगाठ मनाशी बांधली. कोरोना नाकाबंदीत झालेल्या हत्येने त्याचा अभ्यासही थांबला अन् फौजदार होण्याची खूणगाठ कायमची सुटली गेली. त्यामुळे सकाळी घरी लवकर येतो म्हणून सांगणाºया रामेश्वरच्या मृत्यूची वाट शुक्रवारी पहाटेच ठरली. नऊ महिन्याच्या गिरीधरवरील पित्याचे छत्र हरपल्याने आजी अन् मातेलाच आता पित्याचे प्रेम द्यावे लागणार आहे.  

हॅन्डबॉलपटू म्हणून ओळख असलेले रामेश्वर गंगाधर परचंडे (वय ३0, रा. जोडभावी पेठ, सोलापूर) हे आठवीत असताना त्यांचे वडील गंगाधर परचंडे यांचे हृदयविकाराने निधन झाले होते. वडिलांचे छत्र हरपल्यानंतर आई शैला व आजी पार्वती यांनी रामेश्वर परचंडे यांचे पालन पोषण केले. आई आणि आजीच्या संस्कारात शालेय शिक्षण घेतले. दयानंद कॉलेजमध्ये बी.ए. पर्यंत शिक्षण पूर्ण केले. कॉलेजच्या युगात हॅन्डबॉलचा खेळाडू म्हणून त्यांनी अनेक स्पर्धेत यश प्राप्त केले होते. खेळाडू पटू म्हणून त्यांची २0११ मध्ये सोलापूरच्या ग्रामीण पोलीस दलात भरती झाली. २0१३ साली त्यांचं ट्रेनिंग पूर्ण झालं. ग्रामीण पोलीस दलाकडून त्यांनी अनेक स्पर्धा खेळल्या. प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाचे बक्षीस पटकावून सोलापूरची शान राखली होती. अवघ्या २१ व्या वर्षी पोलीस भरती झाल्यानंतर रामेश्वर परचंडे यांनी २0१८ साली नम्रता यांच्याशी विवाह केला. २१ जुलै २0१९ रोजी गिरीधरचा जन्म झाला. गिरीधर सध्या अवघ्या नऊ महिन्यांचा आहे. गिरीधरला उन्हाळ्याचा त्रास होऊ नये म्हणून गेल्या महिन्यात रामेश्वर यांनी कुलर, फ्रीज व अन्य वस्तूंची खरेदी केली होती. दररोज ड्यूटीवर जाताना मुलाला हातात घेऊन खेळवत होते. २१ मे रोजी रामेश्वर परचंडे यांना वडकबाळ येथील नाकाबंदीच्या ठिकाणी नाईट ड्यूटी लागली होती. रामेश्वर परचंडे हे ड्यूटीला निघाले, नेहमीप्रमाणे आई व पत्नीला मी सकाळी लवकर येतो असे सांगून घराबाहेर पडले. वडकबाळ येथील नाकाबंदीच्या ठिकाणी गेले, ड्यूटी जॉईन केली.  २२ मे रोजी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास पिकअप आली, त्याला अडवण्याचा प्रयत्न केला; मात्र गाडी थांबली नाही. पाठलाग करून गाडी अडवली. दुचाकीवरून उतरून गाडी चालकाकडे येत असताना त्याने धडक देऊन जखमी केले. दि.२३ मे च्या पहाटे ५ वाजेपर्यंत रामेश्वर परचंडे यांनी मृत्यूशी झुंज दिली; मात्र शेवटी त्यांनी जगाचा निरोप घेतला.

एकाच महिन्यात तिघांचा वाढदिवस...च्रामेश्वर परचंडे यांचा जन्म दि. १७ जुलै रोजीचा आहे. पत्नी नम्रता यांचा जन्म दिवस दि. २७ जुलै आहे. नऊ महिन्यांचा मुलगा गिरीधर याचा जन्म दि. २१ जुलै रोजी झाला. तिघांचाही जन्मदिवस एकाच महिन्यात असून जुलै महिन्यात मुलाचा पहिला वाढदिवस आहे. हा वाढदिवस मोठ्या पद्धतीने साजरा करण्याचा विचार रामेश्वर परचंडे यांनी केला होता. 

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिसMurderखून