शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

आरटीओचा कारभार रामभरोसे

By admin | Updated: June 12, 2014 01:15 IST

तीन अधिकाऱ्यांच्या जागा रिक्त : १० हजार स्मार्टकार्ड, ७५०० लायसन्स प्रलंबित

सोलापूर: येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील (आरटीओ) उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, दोन सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी अशा तीन महत्त्वाच्या पदांवर अधिकारी नसल्याने सध्या या कार्यालयाचा कारभार रामभरोसे चालला आहे. गेल्या सात महिन्यांपासून सुमारे दहा हजार स्मार्ट आर. सी. कार्ड व ७५०० विविध प्रकारचे लायसन्स प्रलंबित आहेत. याबाबतची कागदपत्रे सहीअभावी कार्यालयातच धूळखात पडली आहेत. नागरिकांना आपल्या कामासाठी हेलपाटे मारावे लागत आहे.सोलापूर येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनिलकुमार वळीव यांची सहा महिन्यांपूर्वी पुणे येथे बदली झाल्याने त्यांच्या जागी अद्याप नवीन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नियुक्त झालेला नाही. अकलूज येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील यांच्याकडे सोलापूर कार्यालयाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आलेला आहे. पाटील हे अकलूज येथील कारभार पाहत महिन्यातून चार ते पाच वेळा सोलापुरातील कार्यालयात हजरेी लावतात. मात्र येथील कामाचा व्याप लक्षात घेता पेडन्सी वरचेवर वाढू लागली आहे.सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी अशोक बी. पवार यांची वसई येथे बदली झाल्याने त्यांच्या जागी अद्याप सहायक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याची नियुक्ती शासनाने केलेली नाही. मुंबई येथून बदलून आलेले सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी गुंजाळ यांच्याकडे पिंपरी चिंचवड आरटीओचा अतिरिक्त कार्यभार असल्याने पवार यांच्याकडून पदभार घेण्यासाठी आले होते. -----------------------------पोस्टाकडे बोट...सोलापूर येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील अनेक कामे प्रलंबित आहेत. ही कामे पूर्ण झाली का याची दररोज शेकडो लोक दूरध्वनीवरुन चौकशी करतात तर अनेक जण समक्ष येऊन चौकशी करतात. मात्र त्यांना समाधानकारक उत्तर मिळत नाही, तसेच कामही होत नाही. स्मार्ट आर. सी. कार्ड व लायसन्स पोस्टाद्वारे पाठविण्याची योजना राबविण्यात येत आहे. त्यामुळे संबंधित कर्मचारी आपली कागदपत्रे पोस्टाद्वारे पाठविली, अशी थातूरमातूर उत्तरे नेहमीच मिळतात. मात्र काम काही पूर्ण होत नाही.-----------------------------------कोणाचाच कोणाला नाही पायपोसजिल्ह्याचे ठिकाण असलेल्या सोलापूर येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात महात्त्वाच्या पदावरील तीन अधिकारी नसल्याने सध्या कोणाचाच कोणाला पायपोस राहिला नाही. नवीन वाहन नोंदणी, जुने वाहन हस्तांतरण, बँक बोजा, ना-हरकत दाखले, मोटार वाहनधारकांची पक्की लायसन्स, नूतनीकरणासाठी दिलेली लायसन्सची कामे प्रलंबित राहिली आहेत. या कामासाठी दररोज शेकडो नागरिक कार्यालयात हेलपाटे मारतात. मात्र या गंभीर समस्येकडे एकाही लोकप्रतिनिधीने लक्ष दिलेले नाही. सत्ताधाऱ्यांबरोबरच विरोधकही गप्प आहेत.