सोलापूर जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेसचा जीएसटी कार्यालयावर मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 12:25 IST2018-01-18T12:24:54+5:302018-01-18T12:25:26+5:30
सॅनेटरी पॅडवरचा जीएसटी कर ताबडतोब शुन्य टक्के करण्यात यावा, सामान्य भारतीय स्त्रीच्या आकांक्षाचा उचित तो सन्मान सरकारने करावा अन्यथा उग्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा सोलापूर जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने जीएसटी कार्यालयास दिलेल्या निवेदनात म्हटले आहे़

सोलापूर जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेसचा जीएसटी कार्यालयावर मोर्चा
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि १८ : सॅनेटरी पॅडवरचा जीएसटी कर ताबडतोब शुन्य टक्के करण्यात यावा, सामान्य भारतीय स्त्रीच्या आकांक्षाचा उचित तो सन्मान सरकारने करावा अन्यथा उग्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा सोलापूर जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने जीएसटी कार्यालयास दिलेल्या निवेदनात म्हटले आहे़
यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष मंदाताई काळे, शहराध्यक्ष सुनिता रोटे, राष्ट्रवादीच्या निरीक्षक निर्मलाताई बावीकर, मंगल शेळवणे, करूणा हिंगमिरे, साधना राऊत, अरूणा माळी, रिजवाना शेख, उषा गरड, सिंधू वाघमारे, यशोदा कांबळे, अनिता पवार, सुरेखा पाटील, उषा भोसले, शशिकला खाडे, सखुताई वाघमारे, रंजना हजारे आदी शहर व जिल्ह्यातील महिला उपस्थित होत्या़ विविध मागण्यांचे निवदेन जीएसटी कार्यालयातील अधिकारी पवार यांना देण्यात आल्याचे सांगण्यात आले़