शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
2
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...
3
कर्नाटक सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी भारतात येणार; ३१ मे रोजी SIT ला सामोरं जाणार
4
तुम्ही आंधळे आहात का? तुमच्यावर विश्वास नाही म्हणत कोर्टानं गुजरात सरकारला फटकारलं
5
"अडवाणी पाकिस्तानी आहेत, भारतात येऊन स्थायिक झाले", राबडी देवींचा भाजपावर निशाणा
6
योगेंद्र यादवांचा पुन्हा दावा; भाजपाचं टेन्शन वाढणार, कुठल्या राज्यात किती जागांचा फटका?
7
प्रेम, शारीरिक शोषण, लग्न अन् तरूणाने काढला पळ; प्रेयसीने भररस्त्यात पकडून दिला चोप
8
Manoj Jarange Patil ...तर आपल्याला सत्तेत जावं लागेल; जातीवादावरून मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान
9
शेअर बाजारात मोठी अस्थिरता, ४ जूनला भाजप सरकार आलं नाही तर काय असेल स्थिती?
10
राहुल गांधींच्या सभेमध्ये मंच कोसळला, नेतेमंडळींचा एकच गोंधळ उडाला
11
KKR चे विजेतेपद ठरणार गौतम गंभीरच्या टीम इंडियाचा प्रशिक्षक बनण्याचा मार्गातील अडथळा!
12
हिरव्या रंगाची पैठणी अन् हाय हिल्स! कान्समधील अभिनेत्रीच्या लूकची चर्चा, सोशल मीडियावर होतंय कौतुक
13
"सोनिया गांधींना तुरुंगात टाकण्याची भाषा करणारे आता...", PM मोदींचा केजरीवालांवर निशाणा
14
कान्समध्ये पुरस्कार पटकावणाऱ्या पायल कपाडिया आहेत आरोपी नंबर 25? पुढील महिन्यात कोर्टात...
15
अरे देवा! पतीने आणल्या 60 प्रकारच्या नेलपॉलिश; सासूने लावताच सून नाराज, ठेवली 'ही' अट
16
"४ जूननंतर ईडीपासून वाचण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ..."; राहुल गांधींचा हल्लाबोल
17
"ससून रुग्णालय आहे की गुन्हेगारांना वाचवणारा अड्डा?"; ललित पाटीलचा उल्लेख करत काँग्रेसचा सवाल
18
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी उच्चांकी स्तरावरून घसरला; Adani Ent आपटला, डिव्हिस लॅबमध्ये तेजी
19
पापुआ न्यू गिनीत भूस्खलनाने हाहाकार; 2000 लोक जिवंत जमिनीखाली गाडले गेले...
20
"विभव कुमार यांना जामीन मिळाला तर मला आणि माझ्या...", स्वाती मालीवाल यांचा कोर्टात मोठा दावा

भीमा खोऱ्यात पाऊस; दौंडमधून उजनीत आले ९ हजार ४० क्युसेक पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 12:09 PM

तीन दिवसात चार टक्के साठा वाढला; चालू पावसाळी हंगामातील ही पहिलीच आवक

भीमानगर : पुणे जिल्ह्यातील भीमा खोऱ्यात होत असलेल्या पावसामुळे उजनी धरणात  दौंडमधून सोमवारी ९ हजार ४० क्युसेक पाण्याची आवक झाली. मंगळवारी ५ हजार क्युसेक पाणी सोडण्यात आले. अवघ्या तीन दिवसात उजनी धरणाचा पाणीसाठा चार टक्क्यांनी  वाढला आहे. चालू पावसाळी हंगामातील ही पहिलीच आवक आहे.

 यावर्षीही पावसाचे प्रमाण जास्त असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. यामुळे हंगामाच्या सुरुवातीलाच आवक सुरू आहे. उजनी धरण लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण आहे. भीमा खोऱ्यात मान्सूनच्या पावसाला उशिरा सुरुवात झाली आहे. सध्या उजनी पाणलोट क्षेत्रातील धरण साखळीतील धरण परिसरात चांगला पाऊस नोंदला आहे. मागील २४ तासात उजनी धरण पाणलोट क्षेत्रात २६९ मिमी पावसाची नोंद आहे. दरम्यान उजनीत आवक झाल्यामुळे उजनी धरण १०० टक्के भरण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. यामुळे धरण लाभक्षेत्रात भुईमुगाची काढणी करून अडसाली ऊस, केळी व कांदा लागवडीची तयारी शेतकऱ्यांनी केली आहे.

२० दिवसात आठ टक्के पाणी वाढले

  • - दरम्यान २० जून रोजी सकाळी उजनी धरणाची स्थिती ही वजा १६.४९ टक्के होती, तर मंगळवारी सकाळी ४८ तासानंतर यात पाच टक्के भर पडल्याने ती वजा १२ टक्के अशी झाली आहे. जवळपास दोन टीएमसी पाणी धरणात आले आहे. 
  • - सध्या उजनी धरण मृत साठ्यात आहे. ते उपयुक्त पातळीत येण्यासाठी ७ टीएमसी पाण्याची गरज यासाठी भीमा खोऱ्यात आणखी दमदार पावसाची आवश्यकता आहे. यंदा उजनी धरण उणे २२.४२ ते उणे १२ अशा स्थितीत आले असून जवळपास ८ टक्के पाण्याची वाढ मागील २० दिवसात झाली आहे.
टॅग्स :SolapurसोलापूरUjine Damउजनी धरणwater shortageपाणीकपातPuneपुणेriverनदी