शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे जवानाने पहाटे गोळीबार करून सहा तांदूळचोरांना लावले हुसकावून

By appasaheb.patil | Updated: March 27, 2019 13:14 IST

रामवाडी गोदामाजवळील थरार : चोरट्यांनी दगडफेक करून पळ काढला

ठळक मुद्देविभागीय सुरक्षा आयुक्त जयण्णा कृपाकर व अन्य वरिष्ठ अधिकाºयांनी घटनास्थळी भेट दिली

सोलापूर : वार मंगळवार... मध्यरात्री बाराची वेळ... रामवाडी गोडावून परिसरात तांदळाने भरलेली बोगी थांबलेली... दोन मोटरसायकलवर स्वार होऊन सहा चोरटे आले... खडकन् आवाज आला... खाकी वर्दीला पाहताच त्यांनी लपण्याचा प्रयत्न... गस्तीवरच्या जवानाने त्यांना अचूक हेरले... पाहता-पाहता दोघांमध्ये धुमश्चक्री सुरू... जवानास जीवे मारण्याचा प्रयत्न करीत चोरट्यांनी केली दगडफेक... पहाटेच्या चार वाजेपर्यंत चोरांना परतवून लावण्यासाठी त्या धाडसी जवानाने हवेत तीन वेळा गोळीबार केला; मात्र तावडीत येणारे चोरटे पळ काढण्यात यशस्वी ठरले, परंतु जवानाने न डगमगता कर्तव्य बजावल्याबद्दल प्रशंसा होत आहे.

शरद लोेंढे असे त्या आरपीएफ जवानाचे नाव असून, मंगळवारी पहाटे चार तास चाललेल्या थराराची दखल घेत लोंढे यांच्या पाठीवर आरपीएफ सुरक्षा आयुक्त जयण्णा कृपाकर यांनी कौतुकाची थाप देत त्यांनी हा थरार प्रसारमाध्यमांपुढे मांडला़ मंगळवारी मध्यरात्री एकच्या सुमारास रेल्वे स्टेशन परिसरात असलेल्या रामवाडी गोदामाशेजारी असलेल्या रेल्वे ट्रॅकवर तांदळाच्या पोत्याने भरलेली बोगी होती़ या बोगीतील तांदळाची पोती चोरण्यासाठी दोन मोटरसायकलवर आलेल्या पाच ते सहा चोरट्यांनी गोदामात प्रवेश केला़ यावेळी गोदामात सुरक्षेसाठी तैनात असलेला जवान शरद लोंढे याने संबंधित चोरट्यांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला़.

यावेळी चोरट्यांनी त्या जवानावर दोन वेळा दगडफेक केली़ या दगडफेकीनंतर शरद लोंढे या जवानाने चोरीघटनेची माहिती देत रेल्वे सुरक्षा बलाचा अधिकचा फोर्स मागविला़ मध्यरात्री एक ते पहाटे तीनपर्यंत या फोर्सने चोरट्यांना शोधण्याचा प्रयत्न केला, मात्र तो असफल झाला़ त्यानंतर ज्यादा फोर्समधील जवानांनी घटनास्थळ सोडले़ त्यानंतर पुन्हा चोरट्यांनी पहाटे साडेतीनच्या सुमारास पुन्हा गोदामात असलेल्या तांदळाची पोती चोरण्याचा प्रयत्न केला़ हा प्रकार निदर्शनास येत असताना जवान शरद लोंढे यांनी पुन्हा त्या चोरट्यांना पळवून लावण्याचा प्रयत्न केला, मात्र त्या चोरट्यांनी पुन्हा दगडफेक केली़ या घटनेची तीव्रता वाढत असल्यामुळे आरपीएफ जवान शरद लोंढे यांनी पहाटे चारच्या सुमारास तीन वेळा हवेत गोळीबार करून चोरांना हुसकावून लावले.

या घटनेची माहिती समजताच विभागीय सुरक्षा आयुक्त जयण्णा कृपाकर व अन्य वरिष्ठ अधिकाºयांनी घटनास्थळी भेट दिली़ या घटनेची माहिती देण्यासाठी सदर बझार पोलीस ठाण्यातील पोलिसांना पाचारण करण्यात आले़ संबंधित शहर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून संबंधित पाच ते सहा चोरट्यांविरुद्ध सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती विभागीय सुरक्षा आयुक्त जयण्णा कृपाकर यांनी दिली.

एकट्यानेच दिले सहा जणांना तोंड - मागील काही महिन्यांपासून रेल्वेच्या रामवाडी गोदामात चोरीच्या घटना घडत असल्यामुळे आरपीएफ पोलिसांनी रामवाडी गोदामात रात्रीच्या वेळी सुरक्षेसाठी दोन जवानांची नियुक्ती केली होती. यामुळे चोरीच्या घटनांमध्ये घट झाली होती, मात्र मंगळवारी पहाटे चोरट्यांनी पुन्हा चोरीचा प्रयत्न केला़ त्यामुळे आरपीएफ पोलिसांनी ज्यादा सुरक्षा वाढविण्याचा निर्णय घेतला आहे़ मंगळवारी चोरी करण्यासाठी आलेल्या चोरट्यांनी एका जवानावर दोन ते तीन वेळा दगडफेक करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला़ त्यामुळे होत असलेल्या चोरीचा प्रकार रोखणे व स्वरक्षणासाठी आरपीएफ जवान शरद लोंढे यांनी हवेत गोळीबार केल्याचा खुलासा विभागीय सुरक्षा आयुक्त जयण्णा कृपाकर यांनी केला आहे़ 

टॅग्स :Solapurसोलापूरrailwayरेल्वेThiefचोर