सोलापुरातील डान्सबारवर छापा; दुकान मालकांसह अकरा जण ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2020 13:15 IST2020-09-28T13:15:25+5:302020-09-28T13:15:30+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकींग

सोलापुरातील डान्सबारवर छापा; दुकान मालकांसह अकरा जण ताब्यात
सोलापूर: सोलापुरातील एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका हॉटेलवर पोलिसांनी रविवारी सायंकाळी छापा मारला. यात तीन नृत्यांगना अश्लील हावभाव करत असताना आढळून आले. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात हॉटेल मालकासह अकरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ याप्रकरणी एकूण २ चारचाकी आणि २ दुचाकी वाहने पोलिसांनी जप्त केले.