भाजीपाला घेऊन जाणाºया पिकअपची पोलीस व्हॅनला धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2020 10:19 IST2020-04-14T10:14:01+5:302020-04-14T10:19:18+5:30

सोलापूर-पुणे रोडवरील घटना; टेंभुर्णी पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचारी जखमी

Push a vegetable pickup to the police van | भाजीपाला घेऊन जाणाºया पिकअपची पोलीस व्हॅनला धडक

भाजीपाला घेऊन जाणाºया पिकअपची पोलीस व्हॅनला धडक

ठळक मुद्दे- सोलापूर-पुणे महामार्गावरील सोमवारी रात्री उशिरा घडली घटना- अपघातातील जखमी पोलीस अधिकारी, कर्मचाºयांवर टेंभुर्णीत उपचार सुरू- अपघातानंतर पिकअपचा चालक पळून जाण्यात यशस्वी

टेंभुर्णी : पिकअप व्हॅन आणि पोलीस जीपची समोरासमोर धडक झाली़ या धडकेत टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांच्यासह चार पोलीस कर्मचारी व दोन पोलीस मित्र जखमी झाले आहेत. ही घटना पुणे - सोलापूर महामार्गावरील भिमानगर येथील एका ढाब्याजवळ सोमवारी रात्री उशिरा घडली.

दरम्यान, अपघातातील जखमींवर टेंभुर्णी येथील खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत़ पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक बाबर ,पोलीस कॉन्स्टेबल धनाजी शेळके, चालक महेश निळ तसेच पोलीस मित्र राजू बनसोडे व हनुमंत लांडगे हे गंभीर जखमी झाले आहेत.

कोरोना वायरच्या पार्श्वभूमीवर सध्या लॉकडाऊन करण्यात आल्याने जिल्ह्याच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. पुणे - सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवरील भीमानगर येथील चेक पोस्टला भेट देण्यासाठी पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे पोलीस कर्मचाºयांसह शासकीय जीपमधून गेले होते़ तेथे गेल्यानंतर त्यांना एका पोलीस कर्मचाºयाचा फोन आला की वेणेगाव येथे काही लोक ट्रक आडवून लूटमार करीत आहेत. ही खबर मिळाल्याने पोलीस निरीक्षक केंद्रे हे शासकीय जीपमधून टेंभुर्णीकडे येत असताना भिमानगर येथील सरदारजींच्या ढाब्याजवळ भाजीपाला घेऊन जाणाºया पिकअपने पुण्याकडे जाण्यासाठी अचानक यूटर्न घेतल्याने पोलिसांची जीप त्या पिकअपवर जावून आदळल्याने हा अपघात झाला. अपघातानंतर पिकअप चालक पळून गेला आहे.



 

Web Title: Push a vegetable pickup to the police van