तळवलकर्स जीम आणि रवी पाटलांची मालमत्ता सील; युको बँकेवरही होणार कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2020 13:14 IST2020-11-27T13:14:04+5:302020-11-27T13:14:26+5:30
मनपा थकीत मिळकत कराची वसुली मोहीम : माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांच्या संस्थेवर होणार कारवाई

तळवलकर्स जीम आणि रवी पाटलांची मालमत्ता सील; युको बँकेवरही होणार कारवाई
सोलापूर : महापालिकेचा साडेअठरा लाख रुपयांचा मिळकत कर न भरल्याप्रकरणी सातरस्ता येथील तळवलकर्स जिमला शुक्रवारी सकाळी सील ठोकण्यात आले.
माजी आमदार रवी पाटील यांच्या शुक्रवार पेठेतील आर वन या इमारतीचा साडे तेरा लाख रुपयांचा कर थकित आहे. या इमारतीलाही सील करण्यात आले. युको बँकेच्या होटगी रोड शाखेकडे साडेसतरा लाख रुपयांची थकबाकी आहे. या बँकेच्या इमारतीलाही सील ठोकण्यात येत होते.
माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांच्या संस्थेकडे महापालिकेची मोठी थकबाकी आहे. या संस्थेवर ही कारवाई होणार आहे, अशी माहिती महापालिका उपायुक्त जमिर लेंगरेकर यांनी दिली