शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
4
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
5
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
6
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
7
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
8
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
9
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
10
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
11
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
12
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
13
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
14
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
15
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
16
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
17
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
18
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
19
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
20
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप

मिळकतकर थकविल्याप्रकरणी सोलापुरातील ‘DSK’ ची मालमत्ता सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2019 10:57 AM

महापालिकेचा गेल्या दोन वर्षांचा मिळकतकर थकविल्याप्रकरणी डीएसके मोटर्सची केगाव (ता. उत्तर सोलापूर) येथील इमारत सील करण्यात आली आहे. 

ठळक मुद्दे मिळकत कर ३१ मार्चपर्यंत भरल्यास नोटीस फी आणि वॉरंट फीमध्ये माफी तर शास्तीमध्ये ५० टक्क्यांची सूट मिळणार सर्वच कर संकलन केंद्रे सकाळी आठ ते सायंकाळी आठ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात आली नागरिकांना या सुविधेचा लाभ मिळावा यासाठी रविवार, ३१ मार्च रोजी मनपाची सर्व कर संकलन केंद्रे आणि गलिच्छ वस्ती सुधारणा विभागाचे संकलन केंद्र सुरू राहणार

सोलापूर : महापालिकेचा गेल्या दोन वर्षांचा मिळकतकर थकविल्याप्रकरणी डीएसके मोटर्सची केगाव (ता. उत्तर सोलापूर) येथील इमारत सील करण्यात आली आहे. 

डीएसके मोटर्सला प्रतिवर्षी तीन लाख ६८ हजार ६७० रुपयांचा मालमत्ता कर आकारला जातो. गेल्या दोन वर्षांपासून डीएसके  मोटर्सने हा कर भरलेला नाही. महापालिकेने दंड आकारणी केली आहे. मनपाचे कर संकलन प्रमुख पी.व्ही. थडसरे म्हणाले, कर वसुलीसाठी डीएसके यांना दोनवेळा नोटीस बजावण्यात आली होती, परंतु त्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यांचा एकही प्रतिनिधी भेटायला आलेला नाही. ही इमारत बंद अवस्थेत आहे. 

शुक्रवारी सायंकाळी कर संकलन पथकाने ही इमारत सील केली. रविवार पेठेतील सरलाबाई सुमन लंकेश्वर यांच्याकडे तीन लाख २१ हजार ८७५ रुपयांची थकबाकी आहे. शुक्रवारी चार गाळे, एक कार्यालय आणि एक शोरुम सील करण्यात आले. मार्कंडेय शॉपिंग सेंटरमधील दोन गाळे धारकांकडे ६५ हजार आणि ७२ हजार रुपयांची थकबाकी आहे. हे गाळेही सील करण्यात आल्याचे कर संकलन प्रमुख थडसरे यांनी सांगितले. शनिवारी आणि रविवारी दिवसभर कारवाई सुरू राहणार आहे. 

कर संकलन केंद्रे रविवारी सुरू राहणार - मिळकत कर ३१ मार्चपर्यंत भरल्यास नोटीस फी आणि वॉरंट फीमध्ये माफी तर शास्तीमध्ये ५० टक्क्यांची सूट मिळणार आहे. सर्वच कर संकलन केंद्रे सकाळी आठ ते सायंकाळी आठ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात आली आहेत. नागरिकांना या सुविधेचा लाभ मिळावा यासाठी रविवार, ३१ मार्च रोजी मनपाची सर्व कर संकलन केंद्रे आणि गलिच्छ वस्ती सुधारणा विभागाचे संकलन केंद्र सुरू राहणार आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिकाTaxकर