प्रकल्पग्रस्त तरुणाला नोकरीवर घेतले नाही म्हणून संपविले जीवन; सोलापूरजवळील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 17:04 IST2025-07-04T17:03:53+5:302025-07-04T17:04:19+5:30
नातेवाईक सुपर थर्मल पॉवरच्या विरोधात आंदोलन करीत आहेत.

प्रकल्पग्रस्त तरुणाला नोकरीवर घेतले नाही म्हणून संपविले जीवन; सोलापूरजवळील घटना
सोलापूर : येथील दक्षिण सोलापूर तालुक्यातील फताटेवाडी (ता. दक्षिण सोलापूर ) येथील सोलापूर सुपर थर्मल पॉवर (NTPC) येथे प्रकल्पग्रस्त एका तरुणाला नोकरीवर घेतले नाही म्हणून त्यांने आत्महत्या करून जीवन संपविले. ही धक्कादायक घटना शुक्रवारी सकाळच्या सुमारास समोर आली.
दरम्यान, मिथुन राठोड (वय 45 राहणार पत्ताटेवाडी) असं आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांने आपल्या शेतात आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केली अशी माहिती पुढे आली आहे. याचबरोबर एनटीपीसी प्रकल्पामध्ये विस्थापित झाल्यानंतर त्याचे वाढीव पैसे मिळावेत यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू होते, नोकरीही मिळाली नाही यामुळेही ते त्रस्त होते अशी ही माहिती आहे. पोलिसांनी आत्महत्येच नेमके कारण अद्याप सांगितले नाही, मात्र नातेवाईक सुपर थर्मल पॉवरच्या विरोधात आंदोलन करीत आहेत. या घटनेची माहिती मिळताच वळसंग पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.