शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
6
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
7
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
8
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
9
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
10
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
11
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
12
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
13
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
14
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
15
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
16
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
17
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
19
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग

परवाने न घेता उत्पादन; कंपोस्ट खताच्या नावाने दिली जातेय माती !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 18:54 IST

शेतकºयांना लागला मीठाचा खडा; सेंद्रिय शेतीच्या प्रयोगाला चालना देण्याची गरज

ठळक मुद्देपशुपालनामधून उपलब्ध होणारे शेण व वैरणीचा कचरा उकिरड्यात कुजविलेले खत शेतीसाठी फायदेशीर शेतीतील पिकाचा बराच भाग जनावरांसाठी वैरण म्हणून वापरला जातोद्राक्ष व डाळिंब उत्पादक शेतकरी छाटणीच्या काड्याचा भुगा करून व उसाचे पाचट, बुडके शेतातच कुजवून जमीन सुपिक करण्याचा प्रयोग

राजकुमार सारोळे

सोलापूर : जिल्ह्यात बोगस रासायनिक व द्रवरूप खतांचा बाजार तेजीत असताना कंपोस्ट खताचीही हीच तºहा असल्याचे ‘लोकमत’च्या पाहणीत आढळले आहे. कंपोस्ट खताच्या नावावर शेतातील मातीच शेतकºयांना भरमसाठ किमतीने विकली जात असल्याचे सांगण्यात आले.

प्रयोगशील शेतकरी उत्पादन वाढीसाठी शेतीमध्ये विविध प्रयोग करताना दिसून येत आहेत. अलीकडच्या काळात रासायनिक खताचा अतिवापर व सेंद्रिय शेतीच्या प्रयोगावर चर्चा झाल्यानंतर कंपोस्ट व गांडूळ खताचा वापर करण्याबाबत शेतकºयांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. वास्तविक रासायनिक खताची मात्रा पिकाला लागू होण्यासाठी शेतजमिनीत कंपोस्ट खत असणे आवश्यक आहे. जर जमिनीत कंपोस्टचे प्रमाण नसेल तर पिकांना रासायनिक खताचा परिणाम दिसून येत नाही. त्यामुळे बागायती पिके विशेषत: फळपिकांची लागवड करण्यासाठी शेतकरी कंपोस्ट खताच्या शोधात असताना दिसून येतात.

पूर्वी गावातील उकिरड्यातून शेतकºयांना कंपोस्ट खत सहज उपलब्ध होत होते. पण आता मागणी वाढली व ग्रामपंचायती कचरा गोळा करीत असल्याने उकिरडे संपत आले आहेत. त्यामुळे काही कंपन्यांनी कंपोस्ट खत बनविण्याचे प्रयोग सुरू केले. नामवंत कंपन्यात बोगसगिरी होत नाही, पण अलीकडे अनेक गावात कंपोस्टचे कारखाने विनापरवाना उघडण्यात आले आहेत. अशा कारखान्यातून लिंबोळी पेंड, मत्स, कोंबडी,शेळी लेंडी खत गोण्यातून उपलब्ध केले जात आहे.

न परवडणारे कंपोस्ट खत- शेतकºयांना कंपोस्ट खत परवडतच नाही. महागडे कंपोस्ट खत खरेदी करून शेतीत वापरल्यानंतर तितके उत्पन्न येण्याची शाश्वती नसतेच. कंपोस्ट खत जमिनीचा पोत सुधारण्यासाठी मदत करते व ही प्रक्रिया निरंतर चालू राहते. सॉईल कंडिशनर म्हणून हल्ली बाजारात लिंबोळी खत मोठ्या प्रमाणावर विकले जाते. छत्तीसगड, गुजरातमध्ये लिंबोळी जून व जुलै महिन्यात फक्त उपलब्ध होते. येथून महागड्या दराने लिंबोळी खरेदी करून त्यापासून खत तयार केले जाते. यामध्ये शंभर टक्के लिंबोळीच्या बियांचा लगदा असतोच असे नाही. बरेचजण यात माती मिसळून त्या दराने या खताची विक्री करताना दिसून येत आहेत. जिल्ह्यात परवाना न घेता असे कारखाने सुरू असल्याचे सांगण्यात आले. यातही कायद्याची अडचण असल्याने कारवाई केल्यावर संबंधित कारखानदारांनी न्यायालयात धाव घेतली आहे.  

जुनेच प्रयोग ठरताहेत शेतकºयांना फायदेशीर- पशुपालनामधून उपलब्ध होणारे शेण व वैरणीचा कचरा उकिरड्यात कुजविलेले खत शेतीसाठी फायदेशीर आहे. शेतीतील पिकाचा बराच भाग जनावरांसाठी वैरण म्हणून वापरला जातो. त्यामुळे कचºयापासून कंपोस्ट ही संकल्पना अशक्य आहे. पण अलीकडे तूर, द्राक्ष व डाळिंब उत्पादक शेतकरी छाटणीच्या काड्याचा भुगा करून व उसाचे पाचट, बुडके शेतातच कुजवून जमीन सुपिक करण्याचा प्रयोग करीत आहेत. यातून गांडूळ खत निर्मितीचा प्रयोग यशस्वी झाला आहे. त्यामुळे शेतकºयांनी स्वत:च कंपोस्ट खत करण्याचे हे पर्याय वापरणे आवश्यक आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरagricultureशेतीFarmerशेतकरीfraudधोकेबाजी