परवाने न घेता उत्पादन; कंपोस्ट खताच्या नावाने दिली जातेय माती !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2020 06:52 PM2020-06-19T18:52:53+5:302020-06-19T18:54:46+5:30

शेतकºयांना लागला मीठाचा खडा; सेंद्रिय शेतीच्या प्रयोगाला चालना देण्याची गरज

Production without licenses; Soil is given in the name of compost manure! | परवाने न घेता उत्पादन; कंपोस्ट खताच्या नावाने दिली जातेय माती !

परवाने न घेता उत्पादन; कंपोस्ट खताच्या नावाने दिली जातेय माती !

googlenewsNext
ठळक मुद्देपशुपालनामधून उपलब्ध होणारे शेण व वैरणीचा कचरा उकिरड्यात कुजविलेले खत शेतीसाठी फायदेशीर शेतीतील पिकाचा बराच भाग जनावरांसाठी वैरण म्हणून वापरला जातोद्राक्ष व डाळिंब उत्पादक शेतकरी छाटणीच्या काड्याचा भुगा करून व उसाचे पाचट, बुडके शेतातच कुजवून जमीन सुपिक करण्याचा प्रयोग

राजकुमार सारोळे

सोलापूर : जिल्ह्यात बोगस रासायनिक व द्रवरूप खतांचा बाजार तेजीत असताना कंपोस्ट खताचीही हीच तºहा असल्याचे ‘लोकमत’च्या पाहणीत आढळले आहे. कंपोस्ट खताच्या नावावर शेतातील मातीच शेतकºयांना भरमसाठ किमतीने विकली जात असल्याचे सांगण्यात आले.

प्रयोगशील शेतकरी उत्पादन वाढीसाठी शेतीमध्ये विविध प्रयोग करताना दिसून येत आहेत. अलीकडच्या काळात रासायनिक खताचा अतिवापर व सेंद्रिय शेतीच्या प्रयोगावर चर्चा झाल्यानंतर कंपोस्ट व गांडूळ खताचा वापर करण्याबाबत शेतकºयांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. वास्तविक रासायनिक खताची मात्रा पिकाला लागू होण्यासाठी शेतजमिनीत कंपोस्ट खत असणे आवश्यक आहे. जर जमिनीत कंपोस्टचे प्रमाण नसेल तर पिकांना रासायनिक खताचा परिणाम दिसून येत नाही. त्यामुळे बागायती पिके विशेषत: फळपिकांची लागवड करण्यासाठी शेतकरी कंपोस्ट खताच्या शोधात असताना दिसून येतात.

पूर्वी गावातील उकिरड्यातून शेतकºयांना कंपोस्ट खत सहज उपलब्ध होत होते. पण आता मागणी वाढली व ग्रामपंचायती कचरा गोळा करीत असल्याने उकिरडे संपत आले आहेत. त्यामुळे काही कंपन्यांनी कंपोस्ट खत बनविण्याचे प्रयोग सुरू केले. नामवंत कंपन्यात बोगसगिरी होत नाही, पण अलीकडे अनेक गावात कंपोस्टचे कारखाने विनापरवाना उघडण्यात आले आहेत. अशा कारखान्यातून लिंबोळी पेंड, मत्स, कोंबडी,शेळी लेंडी खत गोण्यातून उपलब्ध केले जात आहे.

न परवडणारे कंपोस्ट खत
- शेतकºयांना कंपोस्ट खत परवडतच नाही. महागडे कंपोस्ट खत खरेदी करून शेतीत वापरल्यानंतर तितके उत्पन्न येण्याची शाश्वती नसतेच. कंपोस्ट खत जमिनीचा पोत सुधारण्यासाठी मदत करते व ही प्रक्रिया निरंतर चालू राहते. सॉईल कंडिशनर म्हणून हल्ली बाजारात लिंबोळी खत मोठ्या प्रमाणावर विकले जाते. छत्तीसगड, गुजरातमध्ये लिंबोळी जून व जुलै महिन्यात फक्त उपलब्ध होते. येथून महागड्या दराने लिंबोळी खरेदी करून त्यापासून खत तयार केले जाते. यामध्ये शंभर टक्के लिंबोळीच्या बियांचा लगदा असतोच असे नाही. बरेचजण यात माती मिसळून त्या दराने या खताची विक्री करताना दिसून येत आहेत. जिल्ह्यात परवाना न घेता असे कारखाने सुरू असल्याचे सांगण्यात आले. यातही कायद्याची अडचण असल्याने कारवाई केल्यावर संबंधित कारखानदारांनी न्यायालयात धाव घेतली आहे.  

जुनेच प्रयोग ठरताहेत शेतकºयांना फायदेशीर
- पशुपालनामधून उपलब्ध होणारे शेण व वैरणीचा कचरा उकिरड्यात कुजविलेले खत शेतीसाठी फायदेशीर आहे. शेतीतील पिकाचा बराच भाग जनावरांसाठी वैरण म्हणून वापरला जातो. त्यामुळे कचºयापासून कंपोस्ट ही संकल्पना अशक्य आहे. पण अलीकडे तूर, द्राक्ष व डाळिंब उत्पादक शेतकरी छाटणीच्या काड्याचा भुगा करून व उसाचे पाचट, बुडके शेतातच कुजवून जमीन सुपिक करण्याचा प्रयोग करीत आहेत. यातून गांडूळ खत निर्मितीचा प्रयोग यशस्वी झाला आहे. त्यामुळे शेतकºयांनी स्वत:च कंपोस्ट खत करण्याचे हे पर्याय वापरणे आवश्यक आहे.

Web Title: Production without licenses; Soil is given in the name of compost manure!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.