शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
2
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
3
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
4
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
5
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
6
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
7
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
8
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
9
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
10
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
11
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
12
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
13
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
14
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
15
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
16
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
17
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
18
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
19
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
20
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय

प्रेयसीचा खून केल्याप्रकरणी प्रियकरास जन्मठेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2019 1:19 PM

सोलापूर जिल्हा न्यायालयातील सत्र न्यायाधीशांनी ठोठावली शिक्षा 

ठळक मुद्दे- सोलापूर जिल्हा न्यायालयाचा निर्णय- आरोपीस शिक्षेसह दहा हजारांचा दंड, न भरल्यास एक वर्ष साधा कारावास- सुनावणीवेळी न्यायालयात झाली होती गर्दी

सोलापूर : मोबाईल सारखा व्यस्त लागत असल्याने चौकशी केली असता, पत्नीबद्दल अपशब्द बोलल्याचा राग मनात धरून प्रेयसीचा खून केल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.एस. जगताप यांनी प्रियकरास जन्मठेप व दहा हजारांचा दंड, आरोपीने दंड न भरल्यास एक वर्ष साधा कारावास शिक्षा सुनावली. 

बसवराज उर्फ बसू सिद्धलिंग हत्तरके (वय-३0, रा. समाधाननगर, जुनी मशीदजवळ, सोलापूर) असे जन्मठेप झालेल्या आरोपीचे नाव आहे. खटल्याची पार्श्वभूमी अशी की, मयत अनुप्रिया (वय-३६) ही फिर्यादी जगन्नाथ बाळकृष्ण सामलेटी (रा. सोलापूर) याची दुसरी पत्नी होती. २00८ साली फिर्यादी याचे मयत अनुप्रिया हिच्याबरोबर तुळजापूर येथे दुसरे लग्न झाले होते. मयत अनुप्रिया हिला पहिल्या पतीपासून एक मुलगी असून, ती तिच्याजवळच राहत होती. मयत अनुप्रिया हिची आई गीता सुरेश पोला हीसुध्दा तुळजाभवानीनगर येथे मयत अनुप्रियाच्या घरी राहण्यास येत होती. फिर्यादी जगन्नाथ सामलेटी याची पहिली पत्नी जया ही जुने विडी घरकुल, सोलापूर येथे राहण्यास आहे. तिला दोन मुली व एक मुलगा अशी अपत्ये आहेत. फिर्यादी हा आठवड्यातून चार दिवस पहिली पत्नी जया हिच्याकडे तर दोन दिवस दुसरी पत्नी मयत अनुप्रिया हिच्याकडे राहत असे. 

 दि. ९ आॅगस्ट २0१८ रोजी फिर्यादी जगन्नाथ हा त्याच्या पहिल्या पत्नीच्या घरी होता. पहाटे ३.४५ वा़च्या सुमारास अनुप्रिया हिची आई गीता पोला यांनी जगन्नाथ सामलेटी याला मोबाईलवर फोन करून अनुप्रिया हिला कोणीतरी चाकूने मारुन जखमी केले आहे, रक्त भरपूर गेले आहे, तुम्ही लवकर या, असे सांगितले. अनुप्रिया हिच्या शेजारी राहणारे प्रभाकर गंपले व शिंपी यांनीही फोन करून माहिती दिली. जगन्नाथ याने तत्काळ अनुप्रिया हिचे घर गाठले. अनुप्रिया ही जखमी अवस्थेत पडली होती, शेजारी एक चाकू पडलेला होता. जगन्नाथ याने असलेल्या लोकांच्या मदतीने अनुप्रियाला सिव्हिल हॉस्पिटल, सोलापूर येथे दाखल केले. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. गुन्ह्याचा तपास होऊन बसवराज हत्तरके याच्या विरोधात भादंविसंक ३0७ व ३0२ प्रमाणे गुन्हा दाखल होऊन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाले होते. 

खटल्यात साक्षीदाराची साक्ष, मयताची मुलगी, डॉक्टर, घराशेजारी राहणारे साक्षीदार, रासायनिक प्रयोगशाळेचा अहवाल, पंचाच्या साक्षी यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या. जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड. प्रदीपसिंग राजपूत यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपी बसवराज उर्फ बसू सिध्दलिंग हत्तरके याला न्यायालयाने जन्मठेप व दहा हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड़ प्रदीपसिंग राजपूत तर आरोपीतर्फे अ‍ॅड़ बायस यांनी काम पाहिले. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक संपत पवार व वरिष्ठ पोलीस निरीक्षक बजरंग साळुंके यांनी केला. कोर्ट पैरवी म्हणून महिला पोलीस हेडकॉन्स्टेबल चव्हाण यांनी मदत केली. 

टॅग्स :SolapurसोलापूरCourtन्यायालयCrime Newsगुन्हेगारी