सोलापुरातील पोलिस पतीचा प्रताप; अंगावर पेट्रोल टाकून पत्नीला जाळण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 18:30 IST2021-04-15T18:30:47+5:302021-04-15T18:30:50+5:30

घरात कोंडले : पत्नीच्या फिर्यादीनंतर पतीवर गुन्हा दाखल

Pratap of Solapur police husband; Trying to burn his wife by throwing petrol on her body | सोलापुरातील पोलिस पतीचा प्रताप; अंगावर पेट्रोल टाकून पत्नीला जाळण्याचा प्रयत्न

सोलापुरातील पोलिस पतीचा प्रताप; अंगावर पेट्रोल टाकून पत्नीला जाळण्याचा प्रयत्न

सोलापूर : एका महिलेबरोबर आलेल्या संबंधातून पतीने पत्नी प्रीती बन्ने (वय ३२, रा. विष्णूपुरी, जुळे सोलापूर) अंगावर पेट्रोल टाकून तिचा खून करण्याचा प्रयत्न केला. दत्तात्रय बन्ने या पोलीस पतीवर विजापूर नाका पोलिसांनी गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू केली.

प्रीती हिचा विवाह २००३ मध्ये दत्तात्रय याच्याबरोबर झाला होता. त्यांना दोन दोन मुले आहेत. दत्तात्रय हा पोलीस दलात कार्यरत असून त्याची काही वर्षांपूर्वी सोलापूर येथे बदली झाली. येथे आल्यानंतर त्याची ओळख पोलीस दलातील सहकारी महिलेशी झाली. त्यानंतर या महिलेमुळे दत्तात्रय हा १० वर्षांपासून मारहाण करीत होता. सोमवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास दत्तात्रय हा घरी आला आणि पत्नी प्रीतीला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याने आपल्या अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तिला घरात कोंडून तो बाहेर पडला.

दरम्यान, प्रीती हिने मंगळवारी घरच्यांना हा प्रकार सांगितला. नातेवाईक आल्यावर प्रीतीची सुटका करण्यात आली आणि प्रीतीसह नातेवाईक थेट विजापूर नाका पोलीस ठाणे गाठले. दरम्यान, प्रीतीला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Web Title: Pratap of Solapur police husband; Trying to burn his wife by throwing petrol on her body