प्रांजलीचे परदेशात जाण्याचे स्वप्न राहिले अधुरेच; तरुणीवर काळाचा घाला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2025 12:50 IST2025-01-27T12:50:21+5:302025-01-27T12:50:33+5:30

आदल्या रात्री प्रांजली आईशी फोनवर बोलली होती. तिच्या मृत्यूमुळे गावात शोककळा पसरली होती.  

Pranjalis dream of going abroad remained unfulfilled died in accident in pune | प्रांजलीचे परदेशात जाण्याचे स्वप्न राहिले अधुरेच; तरुणीवर काळाचा घाला!

प्रांजलीचे परदेशात जाण्याचे स्वप्न राहिले अधुरेच; तरुणीवर काळाचा घाला!

Pune Accident: पुणे येथे आयआयटी तिसऱ्या वर्षात शिक्षण घेत असलेल्या प्रांजली महेश यादव (रा. टेंभुर्णी, ता. माढा) या विद्यार्थिनीचा शुक्रवारी दुपारी ४ वाजता पुण्यातील हिंजवडी भागात मिक्सर टँकरने चिरडल्याने जागीच मृत्यू झाला. शिक्षण घेऊन परदेशात जाण्याचे तिचे स्वप्न होते. मात्र, काळाने घाला घातल्याने तिचे स्वप्न अधुरे राहिले. 

टेंभुर्णी हॉटेल व्यावसायिक महेश यादव यांना एक मुलगा व एक मुलगी आहे. मुलगा पुणे येथे इंजिनिअरिंग शिक्षण घेत असून, मुलगी प्रांजली ही देखील पुणे येथे आयआयटीच्या तिसऱ्या वर्षात शिक्षण घेत होती. वडील महेश यादव हे येथील कुडूवाडी बायपास ब्रिजजवळ हॉटेल चालवून आपल्या मलांना शिक्षण देत होते प्रांजली हिची रूम पार्टनर आश्लेषा नरेंद्र गावंडे या दोघी एकाच रूमवर राहत होत्या. दोन महिन्यांपूर्वी वडील महेश यांनी प्रांजली हिला स्कूटी घेऊन दिली होती.  २१ जानेवारी रोजी प्रांजली नातेवाईकाच्या लग्नासाठी आली होती. २२ जानेवारी रोजी ती परत पुण्याला गेली. २४ रोजी तिचा अपघाताने मृत्यू झाला. आदल्या रात्री ती आईशी फोनवर बोलली होती. हीच तिची आणि कुटुंबाची शेवटची भेट ठरली. तिच्या मृत्यूमुळे टेंभुर्णी भागात शोककळा पसरली होती.  

दरम्यान, पुणे येथील हिंजवडी-माण रस्त्यावर वाढजाईनगर कॉर्नर जवळ हा अपघात झाला होता. रेडिमिक्सचा टँकरचे नियंत्रण सुटल्याने उलटला, यात मोटारसायकलसह दोघींचा मृत्यू झाला. टँकरमध्ये ३२ टन सिमेंट होते. प्रांजली व तिची मैत्रीण सहा वर्षांपासून एकत्र होते. प्रांजली हिच्या आत्याची मुलगी परदेशात उच्च पदावर नोकरी करत असल्याने आपणही उच्च शिक्षण घेऊन परदेशात जावे हे तिचे स्वप्न होते.

Web Title: Pranjalis dream of going abroad remained unfulfilled died in accident in pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.