दुचाकी-कारच्या धडकेत पोस्ट कर्मचाऱ्याचा मृत्यू
By काशिनाथ वाघमारे | Updated: December 23, 2023 18:58 IST2023-12-23T18:57:35+5:302023-12-23T18:58:13+5:30
शेटफळ - माढा रोडने उपळाई बुद्रुक परिसरात कदम वस्तीजवळ आले असता एका कार (एम. एच. ४५ / ए. ४८८२) ची धडक बसली.

दुचाकी-कारच्या धडकेत पोस्ट कर्मचाऱ्याचा मृत्यू
सोलापूर : दुचाकी व कारच्या अपघातात माढा पोस्ट कार्यालयातील असीस्टंट संदीप प्रेमनाथ म्हेत्रे (वय ४२, रा. दत्तनगर, मोडनिंब, ता. माढा ) यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. हा अपघात शनिवार, २३ डिसेंबर रोजी सकाळी ८.३० च्या दरम्यान उपळाई बुद्रुक परिसरात घडला. पोलीस सूत्राकडील माहितीनुसार, संदीप म्हेत्रे हे सकाळी दुचाकीवरुन पोस्ट कार्यालयात ड्युटीसाठी स्वत:च्या दुचाकी (एम. एच. ४५ / वाय. ४०१९) वरुन मोडनिंबहून माढ्याकडे निघाले होते.
शेटफळ - माढा रोडने उपळाई बुद्रुक परिसरात कदम वस्तीजवळ आले असता एका कार (एम. एच. ४५ / ए. ४८८२) ची धडक बसली. या अपघातात ते गंभीर जखमी झाले. त्यांना माढा शहरातील खासगी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषीत केले. याप्रकरणी माढा पोलिस ठाण्यात कारचालक गणेश पोपट गोसावी (रा. माढा) याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत मयत संदीपचा भाऊ सचिन प्रेमनाथ म्हेत्रे यांनी फिर्याद दिली आहे. संदीप यांच्या पश्चात आई, वडिल, पत्नी, मुलगा, मुलगी आहेत. पोलीस उपनिरीक्षक हांडे हे पुढील तपास करीत आहेत.