शहरं
Join us  
Trending Stories
1
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
6
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
7
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
8
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
9
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
10
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
11
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
12
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
13
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
14
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
15
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
16
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
17
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
18
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
19
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

उद्यान एक्स्प्रेसचा ताबा महिलांच्या हाती; लोकोपायलट, गार्ड, स्टेशन मास्तर, ट्रॅकमॅनही महिलाच

By appasaheb.patil | Published: March 09, 2021 10:59 AM

महिलांनी सांभाळली मध्य रेल्वेची धुरा

सोलापूर : महिला दिनाचे औचित्य साधत मध्य रेल्वेच्यासोलापूर विभागातील बेंगलोर- मुंबई उद्यान एक्स्प्रेसचा ताबा महिलांच्या हाती सोपविण्यात आला होता. लोकोपायलट, गार्ड, स्टेशन मास्तर, तिकीट तपासनीस, हेल्पर, टेक्निशिएन, ट्रॅकमॅन, सुरक्षारक्षकासह इतर कामांसाठीही सोमवारी महिलांनीच पुढाकार घेतला होता.

कोरोनाचे अटी, नियम पाळत मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागात आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यात आला. बेंगलोर-मुंबई (उद्यान) विशेष एक्स्प्रेसचे संचालन संपूर्णपणे सोलापूर विभागातील महिला कर्मचाऱ्यांनी केले. यात लोकोपायलट म्हणून अनिता राज, गार्ड वैशाली भोसले, स्टेशन मास्टर रमिता कुमारी तसेच तिकीट तपासनीस, हेल्पर, टेक्निशिएन स्टाफ, ट्रॅकमॅन आणि सुरक्षारक्षकासहित महिला कर्मचारी कार्यरत होते. तत्पूर्वी महिला कल्याण संघटनेच्या अध्यक्षा प्रतिभा गुप्ता यांनी विभागीय रेल्वे प्रबंधक शैलेश गुप्ता यांच्या उपस्तिथीत हिरवा झेंडा दाखवून विशेष (उद्यान) एक्स्प्रेस सोलापूरहून रवाना केली.

विभागीय कार्यालयातील कार्यक्रमास कर्मचारी लाभ निधीचे मान्यताप्राप्त युनियनचे व असोसिएशनचे सदस्य संजय पवार, राजेश सिडगिड्डी, सचिन बनसोडे, शारदा सिन्हा, कल्याण संगटनेच्या कार्यकारी सदस्या, वरिष्ठ मंडल कार्मिक अधिकारी सुरेंद्र सिंग बाहिरट, मंडल कार्मिक अधिकारी रमेश अय्यर, वरिष्ठ मंडल वाणिज्य प्रबंधक प्रदीप हिरडे आणि सर्व शाखा अधिकारी व महिला कर्मचारी उपस्थित होते.

महिला कर्मचाऱ्यांचा गौरव...

महिला दिनानिमित्त विभागीय कार्यालयात विविध कार्यक्रम व झूम अ‍ॅपच्या माध्यमातून सेमिनार आयोजन करण्यात आले होते. यात डॉ. ज्योती चिडगूपकर यांनी महिला स्वास्थ्य विषयावर मार्गदर्शन केले. महिला दिनापूर्वी चित्रकला, निबंध, रांगोळी अशा विविध स्पर्धांचे आयोजन महिलांसाठी करण्यात आले होते. सर्व स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. कोरोना काळात उल्लेखनीय सेवा देणाऱ्या सोलापूर विभागातील महिला कर्मचाऱ्यांना विभागीय रेल्वे प्रबंधक शैलेश गुप्ता यांच्या हस्ते प्रमाणपत्र व रोख बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.

 

टॅग्स :Solapurसोलापूरcentral railwayमध्य रेल्वेrailwayरेल्वेWomen's Day Specialजागतिक महिला दिन