शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

गरीब अन् श्रीमंत सोलापूर...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2019 15:51 IST

सध्या आमच्या हॉस्पिटलमध्ये मागील काही वर्षांपासून पाठदुखीने त्रस्त असणारे परंतु तरुण मुलं या आजारांनी त्रस्त असणारे पेशंट वाढलेले आहेत. ...

सध्या आमच्या हॉस्पिटलमध्ये मागील काही वर्षांपासून पाठदुखीने त्रस्त असणारे परंतु तरुण मुलं या आजारांनी त्रस्त असणारे पेशंट वाढलेले आहेत.  काही नाममात्र गोळ्या दिल्या की या लोकांना फरक पडतो ...परंतु बघतो काय दर महिन्याला पाच-सहा असे तरुण मुलं पाठदुखी, कंबरदुखी मानदुखीने आमच्याकडे येतातच येतात. मग नीट हिस्ट्री घेतल्यानंतर लक्षात आलं की हे सर्व अतिशय महागड्या टू व्हीलर वापरतात. कुठल्या बरं.. सुझुकी गिक्सर, होंडा होर्नेट, अपाचे एक्स्ट्रीम, पल्सरचे मॉडिफाईड वर्जन, डुकाटी यामाहा !!  तुम्हाला कल्पना आहे लाख लाख रुपयांच्या गाड्या असतात  या.!! 

पण मला प्रामाणिकपणे असं वाटतं की या गाड्या लाँंग ड्राईव्हसाठी आहेत. परदेशांमध्ये किंवा कुठल्या स्पोटर््स रेससाठी, व्हॅली रेससाठी, या पोस्ट बाईक खरंच चांगल्या आहेत.. परंतु सोलापूर सारख्या ठिकाणी जिथे रस्ते अरुंद झालेले आहेत, ट्रॅफिक जाम बºयापैकी असते, जवळच जायचे असते. त्या ठिकाणी अशा बाईक्स वापरून व चुकीच्या पद्धतीने बसून या मुलांच्या मान, पाठ, कंबर दुखतात. पण मला वाईट वाटतं त्यांच्या पालकांचं.. यांच्या आई वडिलांचे!

 कसे काय हे मुलाचा बाळहट्ट पूर्ण करण्यासाठी मरमर करतात.. मुलं ना अशा महागड्या गाड्या घेऊन देतात खरंच कमाल आहे हे!! विषय हा आहे की, गाडी वापरावी किंवा न वापरावी, पण सोलापूरसारख्या गजबजलेल्या ठिकाणी अशा गाड्या घेऊन फिरणं म्हणजे खरंच तुमची मान, पाठ दुखणारच दुखणार. बरं हे आमचे साहेब  किक मारून देखील सुरुवात करू शकत नाहीत!!  बटन स्टार्ट गाड्या आहेत म्हणून आमचे पहिलवान लोक या गाड्या वापरतात.

 बघा विचार करा  तब्येत चांगली असेल ..भरभक्कम राणादादा असेल तर अशा गाड्या वापरण्यासाठी काही हरकत नाही ..पण गाडी आणि तो व्यक्ती एकमेकांना सूटेबल असतील परंतु निवळच चिपाड माणूस, पाप्याच पितर असणारा, छातीचा सापळा झालेल्या माणूस जेव्हा बटन स्टार्ट असणाºया अशा मोठ्या बाईक घेऊन फिरतात तेव्हा ते बघून खरंच वाईट वाटतं.. जाऊ दे आपण कशाला लक्ष द्यायचं ..आपण भलं व आपली स्प्लेंडर, एक्टिव्हा गाडी भली.. बरोबर?  मला आठवतं, लहानपणी शाळेमध्ये हे ज्यांचे वडील स्प्लेंडर गाडीवर मुलांना कधी शाळेत सोडायला आले की आम्ही सर्वजण त्या स्प्लेंडरवर तीन-तीन, चार-चार छोटी मुलं बसून चक्कर मारण्यासाठी त्यांच्या मागे लागायचो.. त्याकाळी टू  व्हिलर म्हणजे फार मोठं सुख असायचं परंतु आज तेच माझे शाळेतले मित्र हफ्त्यावरती किंवा वडिलांचा डोकं खाऊन अशा महागड्या स्पोर्ट बाईक घेऊन फिरतात ते बघून वाईट वाटतं..  चांगल्या कामाची सुरुवात स्वत:पासून करायची आपलं ठरले ना तसं ..म्हणून आपण तरी त्या वाटेला जायचं नाही.. बरोबर ..?- डॉ. सचिन कुलकर्णी

टॅग्स :Solapurसोलापूरtwo wheelerटू व्हीलरSmart Cityस्मार्ट सिटीHealthआरोग्यMedicalवैद्यकीय