शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
9
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
10
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
11
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
12
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
13
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
14
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
15
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
16
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
17
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
18
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
19
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
20
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार

पावसाच्या सरी अंगावर झेलत सोलापुरात निघाली मतदान जनजागृतीची सायकल रॅली

By appasaheb.patil | Published: October 19, 2019 12:30 PM

 विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाचा उपक्रम

ठळक मुद्दे- सायकल रॅलीत शहरातील दोन हजारांहून अधिक विद्यार्थ्यांचा होता सहभाग- मतदान करा...लोकशाही बळकट कराच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला- विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाचा उपक्रम 

सोलापूर : जिल्हा मतदान जनजागृती समिती व जिल्हा निवडणूक अधिकारी, जिल्हा परिषद व सोलापूर महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यामाने शनिवारी सकाळी दहाच्या सुमारास मतदान जनजागृतीनिमित्त भव्य सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. भर पडत्या पावसात हजारो विद्यार्थी या रॅलीत सहभागी झाले होते. 

सोलापूर शहरातील चार हुतात्मा पुतळा येथून या सायकल रॅलीचा शुभारंभ केंद्रीय निवडणूक निरिक्षक विभू राज यांच्या हस्ते करण्यात आला. हिरवा झेंडा दाखवून रॅलीचा शुभारंभ करणेच आला. सोलापूर शहर पोलिस आयुक्त अंकुश शिंदे सर, व महानगर पालिका आयुक्त दीपक तावरे सर सपत्नीक सहभागी झाले होते. मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ सर, महानगर पालिका अतिरिक्त आयुक्त श्रीकांत मायकलवार सर, सहाय्यक जिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहल भोसले, उप मुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील , शिक्षणाधिकारी संजय राठोड , महिला व बाल कल्याण विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी जावेद शेख, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, स्वीप समिती सदस्य अविनाश गोडसे, उप शिक्षणाधिकारी सुधा साळुंखे, विस्तार अधिकारी अशोक भांजे, क्रिडा शिक्षक व समन्वयक अनिल पाटील, हुतात्मा पुतळा येथून सुरूवात झालेल्या सायकल रॅली डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, जिल्हा परिषद, सात रस्ता , डफरीन चौक या मार्गाने काढण्यात आली. 

सोलापूर शहरातील दोन हजार पेक्षा अधिक विद्यार्थी तसेच दक्षिण व उत्तर सोलापूर पंचायत समिती व तालुक्यांतील कर्मचारी सहभागी झाले होते.  मतदानासाठी वेळ काढा...आपली जबाबदारी पार पाडा.. मतदान करा लोकशाही बळकट करा... घोषणांनी परिसर दणाणून गेला. हातात मतदान जनजागृतीचे संदेश असलेले फलक घेऊन हजारो विद्यार्थी सहभागी झाले होते.

जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी केलेल्या आवाहनास शनिवारी पावसाच्या सुरू अंगावर घेत विद्यार्थी व नागरिक व कर्मचारी सहभागी झाले होते. 

टॅग्स :Solapurसोलापूरvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूकSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयVotingमतदान