राजकीय बातमी; विधानपरिषदेची निवडणूक नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2021 13:03 IST2021-10-11T13:02:33+5:302021-10-11T13:03:23+5:30
१५ डिसेंबर पूर्वी निवडणूक कार्यक्रम राबवून नूतन सदस्याची निवड करणे गरजेचे असल्याने निवडणूक विभाग कामाला लागला आहे.

राजकीय बातमी; विधानपरिषदेची निवडणूक नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात
सोलापूर : विधानपरिषदेचे सदस्य प्रशांत परिचारक यांची १५ डिसेंबरला मुदत संपत असल्याने, त्यांच्या जागेसाठी निवडणूक लागणार आहे. त्याची तयारी निवडणूक विभागाकडून सुरू असून, नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून निवडणूक कार्यक्रम सुरू होईल. निवडणूक कार्यक्रमाची घोषणा ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात होईल. तशी तयारी निवडणूक विभागाकडून सुरू असल्याची निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
१५ डिसेंबर पूर्वी निवडणूक कार्यक्रम राबवून नूतन सदस्याची निवड करणे गरजेचे असल्याने निवडणूक विभाग कामाला लागला आहे. या विधानसभा जागेसाठी जवळपास साडे पाचशे मतदार असून, मतदारांची प्रारूप यादी अंतिम करण्याचे काम पूर्ण झाले. लवकरच प्रारूप यादी प्रसिद्ध होईल. महापालिका व नगरपालिकांचे नगरसेवक, तसेच जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सभापती आदींना मतदानाचा अधिकार आहे.
१५ डिसेंबर रोजी प्रशांत परिचारक यांच्या सहा वर्षांची कारकिर्दी पूर्ण होत आहे. परिचारक यांची कारकिर्दी वादळी ठरली असून, भारतीय सैनिकांच्या पत्नींबद्दल अपशब्द वापरल्याप्रकरणी त्यांना विधानपरिषदेतून दोन वर्षांसाठी निलंबित केले गेले, परंतु त्यापूर्वीच त्यांचे निलंबन रद्द झाले. इतर कारणासाठीही परिचारक चर्चेत राहिले.