पिकअप-दुचाकीचा अपघात, तिघांचा जागीच मृत्यू, बार्शीजवळील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 15:56 IST2018-11-26T15:53:48+5:302018-11-26T15:56:44+5:30
बार्शी : कुर्डूवाडीहुन लातूरकडे निघालेल्या पिकअप जीपने समोरून येणाºया दोन दुचाकीस्वारांना जोराची धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील तिघांचा जागीच ...

पिकअप-दुचाकीचा अपघात, तिघांचा जागीच मृत्यू, बार्शीजवळील घटना
बार्शी : कुर्डूवाडीहुन लातूरकडे निघालेल्या पिकअप जीपने समोरून येणाºया दोन दुचाकीस्वारांना जोराची धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील तिघांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी दुपारी ३ च्या सुमारास बार्शी-कुर्डूवाडी रस्त्यावर घडली.
याबाबत पोलीसांनी दिलेली प्राथमिक माहिती अशी की, कुर्डूवाडीहुन लातूरकडे शेळ्या घेऊन जात असलेली (एमएच २४ एबी ५४०५) पिकअप बार्शीजवळील खांडवीजवळ भरधाव वेगात आली असता समोरून येणाºया (एमएच ११, ८१०७) या दोन दुचाकीस्वारांना जोराची धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील तिघांचा मृत्यू झाला आहे, यात एक जण गंभीर जखमी झाले असून त्यास उपचारासाठी बार्शी येथील जगदाळेमामा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर या मार्गावरील वाहतुक खोळंबली होती. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे.
सविस्तर वृत्त थोडक्याच वेळात...