कार्तिकीसाठी पवार की फडणवीस? एकादशी २३ नोव्हेंबर २०२३ रोजी होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2023 05:22 IST2023-10-04T05:22:28+5:302023-10-04T05:22:55+5:30

कार्तिकी एकादशी २३ नोव्हेंबर २०२३ रोजी होणार आहे.

Pawar or Fadnavis for Karthik? Ekadashi will be held on 23 November 2023 | कार्तिकीसाठी पवार की फडणवीस? एकादशी २३ नोव्हेंबर २०२३ रोजी होणार

कार्तिकीसाठी पवार की फडणवीस? एकादशी २३ नोव्हेंबर २०२३ रोजी होणार

पंढरपूर : कार्तिकी एकादशी २३ नोव्हेंबर २०२३ रोजी होणार आहे. या दिवशीची पहाटे २:२० वाजता होणारी विठ्ठलाची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री आणि मानाचे वारकरी यांच्या हस्ते सपत्नीक केली जाणार आहे. मात्र, देवेंद्र फडणवीसअजित पवार यांच्यापैकी कोणाला बोलवायचे, याबाबत विधी व न्याय विभागाच्या अधिकाऱ्यांना भेटून निर्णय घेणार असल्याचे श्री विठ्ठल - रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले.

  यात्रेच्या अनुषंगाने मंदिर समितीची बैठक मंगळवारी झाली. औसेकर म्हणाले, कार्तिक यात्रा कालावधी १४ ते २७ नोव्हेंबर २०२३ असा राहणार आहे. या यात्रा कालावधीत सुमारे १० ते १२ लाख भाविक येतात.

Web Title: Pawar or Fadnavis for Karthik? Ekadashi will be held on 23 November 2023