सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांना पितृशोक; विठोबा भरणे यांचे पुण्यात निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 09:03 IST2020-12-30T09:02:21+5:302020-12-30T09:03:16+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकिंग

सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांना पितृशोक; विठोबा भरणे यांचे पुण्यात निधन
करमाळा : सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांना पितृशोक झाला असून त्यांचे वडील विठोबा भरणे यांचे काळ रात्री उपचार सुरु असताना पुण्यात निधन झाले आहे. आज सकाळी ११ वाजता त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
प्रगतशील शेतकरी असणारे आणि तात्या नावाने सुपरिचित असणारे विठोबा भरणे यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे पुणे येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, तेथे उपचार सुरु असताना काल रात्री अकरा वाजण्याच्या दरम्यान त्यांचे निधन झाले. मृत्यूसमयी ते ९० वर्षांचे होते.
इंदापूर तालुक्यातील भरणेवाडी हे त्यांचे मूळ गाव असून या गावी आज सकाळी अकरा वाजता अंत्यंसंस्कार करण्यात येणार आहेत, तात्यांच्या निधनाने भरणे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून इंदापुर तालुक्यातून शोक व्यक्त केला जात आहे.