शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्ण शर्माने हातात चेंडू असूनही संजू सॅमसनला रन आऊट नाही केले, विराटचे डोक फिरले 
2
पुणे अपघात प्रकरणी बाल हक्क न्यायालयाचा मोठा निर्णय; १७ वर्षांच्या 'बाळा'ची बालसुधारगृहात रवानगी
3
"मद्य घोटाळा असो किंवा नॅशनल हेराल्ड घोटाळा...", PM मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल
4
RCB चे तारे ज़मीन पर! महत्त्वाच्या सामन्यात शरणागती, राजस्थान रॉयल्सची सुरेख गोलंदाजी
5
हरियाणामध्ये राहुल गांधींसमोरच उफाळला वाद,  काँग्रेसच्या दोन नेत्यांमध्ये बाचाबाची, त्यानंतर...
6
फुल राडा! RR चा कोच कुमार संगकारा तिसऱ्या अम्पायरला जाब विचारायला गेला अन्... Video
7
रोव्हमन पॉवेलचा Stunner कॅच; फॅफ ड्यू प्लेसिस माघारी, पण विराट कोहलीने रचला विक्रम भारी
8
विराट कोहलीला 'फसव्या' चेंडूवर युझवेंद्र चहलने गंडवले; विक्रमवीराला तंबूत पाठवले, Video 
9
भाजप किती जागा जिंकेल? अमेरिकेतील प्रसिद्ध राजकीय तज्ञाने केली भविष्यवाणी, म्हणाले...
10
Fact Check: राष्ट्रपती मुर्मू यांच्या रंगावर भाष्य करतानाचा पंतप्रधान मोदींचा 'तो' Video एडिटेड
11
PHOTOS: ब्यूटी विद ब्रेन! सर्वात तरूण IAS अधिकारी; सौंदर्याच्या बाबतीत जणू काही अभिनेत्रीच
12
पुण्यातील अपघाताबाबत राहुल गांधींचा तो दावा गैरसमजातून, असीम सरोदेंनी सांगितली कायद्यातील तरतूद
13
उच्च न्यायालयाचा ममता सरकारला दणका; 2010 नंतर दिलेली सर्व OBC प्रमाणपत्रे रद्द
14
आला उन्हाळा, तब्येत सांभाळा; उष्णतेमुळे 'या' आजारांचा सर्वाधिक धोका
15
धार्मिक वक्तव्ये टाळा, सैन्याचे राजकारण करू नका; भाजप-काँग्रेसला निवडणूक आयोगाचे निर्देश
16
इंडिया आघाडीतून पंतप्रधान कोण होणार? जयराम रमेश म्हणाले- "सर्वात मोठ्या पक्षाचा उमेदवार..."
17
वर्ल्ड कपच्या तोंडावर अमेरिकेकडून बांगलादेशचा धुव्वा; भारताच्या शिलेदारानं सामना गाजवला
18
राज ठाकरेंचं विधान अन् सभागृहात हशा; मुलांमधील लठ्ठपणाबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
19
पुणे अपघात: 'या' ३ प्रश्नांची उत्तरे आता तुम्हीच द्या; अंबादास दानवेंनी केली अजित पवारांची कोंडी
20
टोळी, खंडणी, सोनेतस्करी.. बेपत्ता बांगलादेशी खासदाराचा कोलकातामध्ये सापडला मृतदेह, तिघांना अटक

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेची जागा कॉंग्रेस पक्षाचीच : नितीन नागणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 4:52 PM

सोलापूर लोकमत ब्रेकींग

पंढरपूरपंढरपूर - मंगळवेढा ही विधानसभेची जागा पुर्वीपासून कॉंग्रेस पक्षाकडे असल्याने पुन्हा या जागेची मागणी कॉंग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे केली असून पक्षाने आदेश दिल्यास या पोटनिवडणूकीच्या रिंगणात उतरणार असल्याची माहिती सोलापूर जिल्हा युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष नितीन नागणे यांनी दिली आहे.

2009 साली स्व.आमदार भारत भालके यांनी रिडालोस या आघाडीतून विजयी झालेल्या पहिल्या दिवशी कॉंग्रेसचे मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी भालके यांना मुंबईला येण्यासाठी खास विमान पाठवून दिले होते. त्या दिवशी ते मुंबई येथे आल्यानंतर त्यांनी कॉंग्रेसचे सहयोगी सदस्यत्व घेतलेले होते. 2009 ते 2019 या 10 वर्षांच्या काळात ही पंढरपूर - मंगळवेढा ही विधानसभेची जागा कॉंग्रेस पक्षाकडे होती. त्यावेळी स्व.भालके व राष्ट्रवादी पक्षाने कॉंग्रेसला न विचारता 2019 साली राष्ट्रवादीने भालकेंना उमेदवारी दिली.

नागणे म्हणाले की, प्रत्येक पक्षाला आपला पक्ष वाढविण्याचा अधिकार आहे. या दृष्टीकोनातून सध्या कॉंग्रेसची वाटचाल सुरू आहे. सध्या पंढरपूर - मंगळवेढा मतदारसंघात कॉंग्रेसला मानणारा मोठा मतदारवर्ग आहे. त्यामुळे सदरची जागा पुन्हा एकदा कॉंग्रेस पक्षाला सोडण्यात यावी अशी मागणी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशिलकुमार शिंदे साहेब, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, प्रदेश कार्याध्यक्षा प्रणितीताई शिंदे, युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीतदादा तांबे यांच्याकडे निवेदनाद्वारे केलेली आहे.

कॉंग्रेस पक्षाने आदेश दिल्यास उमेदवारी अर्ज भरणार - नितीन नागणे

सध्या पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणूक सुरू झालेली आहे. या मतदारसंघात कॉंग्रेसच्या विचारांचा मोठा मतदार आजही आहे. त्यामुळे या जागेची आपण कॉंग्रेस पक्षाकडे मागणी केलेली आहे. त्यामुळे कॉंग्रेस पक्षाने आदेश दिल्यास आपण उमेदवारी अर्ज भरणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष नितीन नागणे यांनी दिलेली आहे.

टॅग्स :Solapurसोलापूरcongressकाँग्रेसpandharpur-acपंढरपूरElectionनिवडणूकPandharpurपंढरपूर