शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

 ‘पल्याडवासी’ १५ डिसेंबरपासून राज्यभर प्रदर्शित होणार, पारधी समाजाच्या जीवनावर टाकला प्रकाश 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2017 11:50 AM

पारधी समाजाचा जीवनप्रवास व त्यांच्या समस्यांवर आधारित प्रगती कोळगे दिग्दर्शित ‘पल्याडवासी’ चित्रपट १५ डिसेंबरपासून राज्यभर प्रदर्शित होत आहे़ सोलापूरमध्ये दोन चित्रपटगृहात हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याची माहिती कोळगे यांनी पत्रकार परिषदेत दिली़

ठळक मुद्देआजपर्यंत २७ विजयी पुरस्कारांसह एकूण ७९ पुरस्कार प्राप्तया चित्रपटाची निर्मिती प्रगती कोळगे, सुमन बाबुराव कोळगे यांनी केली आहे़ सोलापूरमध्ये दोन चित्रपटगृहात हा चित्रपट प्रदर्शित होणार या चित्रपटाचे संपूर्ण चित्रीकरण उस्मानाबाद जिल्ह्यात झाले

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि ५ : पारधी समाजाचा जीवनप्रवास व त्यांच्या समस्यांवर आधारित प्रगती कोळगे दिग्दर्शित ‘पल्याडवासी’ चित्रपट १५ डिसेंबरपासून राज्यभर प्रदर्शित होत आहे़ सोलापूरमध्ये दोन चित्रपटगृहात हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याची माहिती कोळगे यांनी पत्रकार परिषदेत दिली़समाजातील उपेक्षित घटक म्हणून पाहिला जात असलेला पारधी समाज अजूनही प्रगतीच्या वाटेवर आलेला नाही़ त्यांच्यावर सतत चोरीचा आरोप होतो़ हा डाग या प्रबोधनात्मक चित्रपटातून पुसण्याचा प्रयत्न केला गेला आहे़ या चित्रपटाचे संपूर्ण चित्रीकरण उस्मानाबाद जिल्ह्यात झाले असून आजपर्यंत २७ विजयी पुरस्कारांसह एकूण ७९ पुरस्कार प्राप्त झाले आहेत़ या चित्रपटाची निर्मिती प्रगती कोळगे, सुमन बाबुराव कोळगे यांनी केली आहे़ कथा-पटकथा आणि संवादलेखनही त्यांनीच केले आहे़ अनिकेत खंडागळे यांनी छायाचित्रण केले आहे़ जयभीम शिंदे यांचे संगीत आहे़ धनंजय तांदळे यांचे गीत आहे़ या चित्रपटात विश्वनाथ काळे, अभिषेकसिंह हरेर, सोहन कांबळे, विशाल देशमुख, प्रतीक हांगे, विशाल साखरे, कुणाल पवाप, मनोज यादव, आकाश बनसोडे, कार्तिक माने, मुकुं द जाधव, रविकिशन शर्मा, अलोक शिंदे, आकांक्षा बनसोडे यांनी भूमिका बजावल्या आहेत़  या पत्रकार परिषदेस आकाश बनसोडे आणि त्यांचे सहकारी उपस्थित होते़ --------------------त्यांना रोजगारही दिला- प्रगती कोळगे यांनी पारधी समाजातील कलाकारांना घेऊन चित्रपट बनवत असताना सहकलाकारांना रोजगार तर मुख्य कलाकारांना मानधन देऊन चित्रपट बनवावा लागल्याचा अनुभव सांगितला़ चित्रपट नसता तर हेच कलाकार त्या दिवशी रोजगारासाठी बाहेर पडले असते़ त्यामध्ये त्यांची उपजीविका थांबू नये म्हणून साºया पातळ्यांवर त्यांच्याशी जोडून घेत जावे लागल्याचे त्या म्हणाल्या़ कथा-पटकथा साकारण्यात अडीच महिने गेले तर शुटिंगच्या पूर्वतयारीत दीड महिना गेला़ आॅडिशन घेतानाही एक प्रकारची परीक्षाच दिग्दर्शकांना द्यावी लागली़ उत्कृष्ट तंत्रज्ञान, साधनांचा वापर करत असताना कुठेही हात आखडता आणि संकुचित वृत्ती बाळगली नसल्याच्या त्या म्हणाल्या़ पारधी समाज हाच चित्रपटाचा आत्मा- कथेचा समाज जो केंद्रबिंदू होता त्या समाजातील गायक निवडताना त्यांना सूर ना ताल, ना गाण्याचा गंध़ त्यांची तयारी करून गायनाला एका साच्यात आणत असताना स्वत:ला एक वेगळी परीक्षा द्यावी लागली़ हा प्रयत्न म्हणजे आयुष्यातला एक वेगळा प्रयोगच होता़ समाजात वाढत असताना अवतीभोवती या समाजाच्या समस्या, वेदना यांची सामाजिक जाणीव होत होती़ म्हणून पारधी समाज हाच चित्रपटाचा आत्मा ठरला़

टॅग्स :Solapurसोलापूरmarathiमराठी