आमचा शिक्षणाधिकारी नालायक अन् बेशरम; बळीराम साठेंचे वादग्रस्त वक्तत्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2020 18:00 IST2020-02-13T17:56:46+5:302020-02-13T18:00:30+5:30

सोलापूर जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत जिल्हा परिषद सदस्य आक्रमक

Our education officer is worthless and shameless; Debate speech by Baliram reserves | आमचा शिक्षणाधिकारी नालायक अन् बेशरम; बळीराम साठेंचे वादग्रस्त वक्तत्व

आमचा शिक्षणाधिकारी नालायक अन् बेशरम; बळीराम साठेंचे वादग्रस्त वक्तत्व

ठळक मुद्दे- सोलापूर जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा सुरू- सर्वसाधारण सभेत शिक्षण, आरोग्य विभागाच्या प्रश्नावर गदारोळ- जिल्हा परिषद सदस्य व अधिकाºयांमध्ये वादावादी

सोलापूर : माध्यामिक शिक्षणाधिकारी सुर्यकांत पाटील नालायक व बेशरम आहेत असे वादग्रस्त वक्तत्व जिल्हा परिषदेच्या सभेत विरोधी पक्षनेते बळीराम साठे यांनी केले आहे़ मला माफ करा मी जे काही वक्तत्व करीत आहे त्यामागील संताप समजावून घ्या असेही साठे म्हणाले.

जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा अध्यक्ष अनिरूध्द कांबळे याच्या अध्यक्षतेखाली बुधवारी सुरू आहे़ या सभेत जिल्हा परिषद सदस्य भारत शिंदे यानी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली नसल्याची तक्रार केली़ याला उत्तर देण्यासाठी माध्यामिक शिक्षणाधिकारी सुर्यकांत पाटील सभागृहात उठले असता विरोधी पक्षनेते बळीराम साठे यांनी त्यांना थांबवित याला आधी खाली बसवा...हा शिक्षणाधिकारी नालायक व बेशरम आहे... याला येथे काम करायचे नाही. पदभार घेतल्यापासून वारंवार रजा काढून निघून जात आहे. त्यामुळे अनेक शाळा, शिक्षक व कर्मचाºयांची कामे खोळंबली आहेत.

 कामकाजाबाबत सदस्यांनी अनेक वेळा विनंती करून सुध्दा यांनी दाद दिलेली नाही. त्यामुळे या सभागृहात सुर्यकांत पाटलांना बोलण्याचा अधिकार नाही व आम्ही त्यांना बोलू देणार नाही अशी भूमिका घेतली़ साठे याच्या या रूद्रावताराने सभागृह अवाक् झाले आणि माध्यामिक शिक्षणाधिकारी काही न बोलता खाली बसले.

Web Title: Our education officer is worthless and shameless; Debate speech by Baliram reserves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.