कांद्याला प्रतिक्विंटलला मिळाला ७,६०० रुपयांचा उच्चांकी दर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2019 02:30 AM2019-11-21T02:30:59+5:302019-11-21T02:32:30+5:30

सोलापूर बाजार समितीत कांद्याची आवक वाढत असताना दरातही वाढ होत असल्याचे यावरुन दिसत आहे

Onion received the highest rate of Rs | कांद्याला प्रतिक्विंटलला मिळाला ७,६०० रुपयांचा उच्चांकी दर

कांद्याला प्रतिक्विंटलला मिळाला ७,६०० रुपयांचा उच्चांकी दर

Next

सोलापूर : बुधवारी कांद्याला प्रतिक्विंटलला ७,६०० रुपये इतका सर्वाधिक दर मिळाला. या वर्षातील हा उच्चांकी दर आहे. सोलापूर बाजार समितीत कांद्याची आवक वाढत असताना दरातही वाढ होत असल्याचे यावरुन दिसत आहे. यावर्षी कांद्याला प्रतिक्विंटल साडेसहा हजार रूपये दर मिळाला होता.

कांद्याचे यावर्षी परतीच्या पावसाने मोठे नुकसान केले आहे. यामुळे कांद्याच्या उत्पादनावर परिणाम झाला असून राज्यातील बाजार समित्यामध्ये आवश्यक तेवढा कांदा विक्रीसाठी येत नाही. पुरेसा कांदा येत नसल्याने वरचेवर कांद्याचे दर वाढत आहेत. बुधवारी सोलापूर बाजार समितीत ११८ ट्रक कांदा विक्रीसाठी आला होता. २३,७६२ पिशव्यांचे वजन १८,८८१ क्विंटल झाले. क्विंटलला सर्वाधिक ७,६०० रुपये इतका दर मिळाल्याचे सांगण्यात आले. हा गेल्या दोन वर्षांतील उच्चांकी दर समजला जातो. सरासरी क्विंटलला तीन हजार रुपये दर मिळाला आहे. सोलापूर बाजार समितीत राज्यभरातून कांदा विक्रीसाठी येत असल्याचे सांगण्यात आले.

Web Title: Onion received the highest rate of Rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :onionकांदा