मोदींच्या प्रतिमेला घातला कांद्याचा हार; कांदा निर्यातबंदीच्या विरोधात काँग्रेसचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2020 11:31 IST2020-09-16T11:29:05+5:302020-09-16T11:31:03+5:30

पंढरपूर लोकमत ब्रेकिंग

Onion garland on Modi's image; Congress agitation against onion export ban | मोदींच्या प्रतिमेला घातला कांद्याचा हार; कांदा निर्यातबंदीच्या विरोधात काँग्रेसचे आंदोलन

मोदींच्या प्रतिमेला घातला कांद्याचा हार; कांदा निर्यातबंदीच्या विरोधात काँग्रेसचे आंदोलन

पंढरपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने कांद्याचे निर्यातिला बंदी केले आहे. या निर्णयाच्या विरोधात युवक काँग्रेसच्या वतीने पंढरपूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेला कांद्याचा हार घालून निषेध आंदोलन करण्यात आले.

सध्या लॉकडाऊनचा कालावधी असतो. सामान्य नागरिकांचा शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत आहे. अशातच केंद्र सरकारने कांद्यावर निर्यातबंदी टाकले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान होणार आहे. यामुळे हे निर्यात बंदी उठवावी अशी मागणी युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आली. हे आंदोलन संत गाडगे महाराज मराठा धर्मशाळेसमोर करण्यात आले.

Web Title: Onion garland on Modi's image; Congress agitation against onion export ban