शहरं
Join us  
Trending Stories
1
मनुस्मृतीतील काही भाग अभ्यासक्रमात?; पवारांचे आरोप, फडणवीसांचं आक्रमक प्रत्युत्तर
2
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
3
पंतप्रधान मोदी यांचे वाराणसीच्या लोकांसाठी मतदानाच्या आधी खास पत्र, दिला महत्त्वाचा संदेश
4
थोडी जरी नैतिकता असेल तर राजीनामा द्या; रोहित पवारांचा फडणवीस, अजितदादांवर हल्लाबोल
5
केदारनाथ मध्ये मोठा हेलिकॉप्टर अपघात टळला, चालकाच्या प्रसंगावधानामुळे वाचले प्रवाशांचे प्राण 
6
अल्पसंख्याक महिला करायची योगींचं समर्थन, अचानक गुंडांनी घरात घुसून केली मारहाण, त्यानंतर...
7
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
8
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
9
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
10
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
11
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
12
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री
13
पुण्यानंतर मुंबईतही तेच! अल्पवयीन मुलानं बेदरकारपणे बाइक चालवत घेतला एकाचा जीव
14
एकाच कुटुंबातील ६ जणांनी एकाच वेळी कापली हाताची नस, एक जण मृत्युमुखी, ५ गंभीर, समोर आलं धक्कादायक कारण 
15
"आचार संहितेचे बहाणे करू नका, तातडीने उपाययोजना करा", नाना पटोलेंची सरकारकडे मागणी
16
निवडणूक संपताच शिंदे गटात वादाचे फटाके; "गजानन किर्तीकरांवर कारवाई झाली तर..."
17
हातातील बांगड्यांनी उलगडलं गर्भवती युवतीच्या हत्येचं रहस्य; पतीनं रचला होता बनाव
18
चालताना नेमकं काय लक्षात ठेवायचं... वेळ, पावलं की अंतर?; वजन लवकर होईल कमी
19
लैला खान हत्या प्रकरणात सावत्र वडिलांना फाशीची शिक्षा, १३ वर्षांनी अभिनेत्रीला मिळाला न्याय
20
Suresh Raina ने पाकिस्तानी पत्रकाराला झापले, शाहिद आफ्रिदीवरून करत होता ट्रोल 

ज्यांच्यावर रुग्णांनी फुलं उधळली, ते डॉक्टर होते; जे उपचारासाठीे दाखल झाले, तेही डॉक्टरच होते !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2020 3:08 PM

‘सिव्हिल‘मध्ये विरोधाभासाच्या दोन घटना : बरे होऊन बाहेर पडणाºयांकडून कौतुक होत असताना दुसरीकडे तीन डॉक्टर ‘आयसोलेशन’मध्ये..

ठळक मुद्दे१२ रुग्ण बरे झाल्याने आता सोलापुरात कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ही ४१ झालीबरे झालेल्या रुग्णांना घरी सोडताना पोलीस, डॉक्टर, परिचारिका, सफाई कर्मचारी यांनी टाळ्या वाजवत अभिनंदन केलेकोरोनामुक्त झालेल्या रुग्णांनी डॉक्टर व इतरांवर फुले उधळल्याने त्याच्या चेहºयावर समाधान दिसत होते

सोलापूर : येथील शासकीय रुग्णालयाच्या आवारात रविवारी दोन विरोधाभासाची दृश्ये अनुभवायला मिळाली. एकीकडे बरे होऊन बाहेर पडणारे रुग्ण डॉक्टरांवर फुले उधळत होते तर दुसरीकडे कोरोना पेशंट म्हणून एका परिचारिकेसह तीन डॉक्टर आयसोलेशनमध्ये दाखल झाले होते. 

शहरात कोरोनाचे सर्वाधिक ४८ रुग्ण आढळून आले. यात पोलीस कर्मचाºयांसह, सरकारी डॉक्टरांचा समावेश आहे. दोन दिवसांपूर्वी सिव्हिल हॉस्पिटलमधील एका महिला डॉक्टरला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. या डॉक्टरच्या संपर्कातील इतर डॉक्टर, नर्स यांची स्वॅब टेस्ट घेण्यात आली. यात एक महिला डॉक्टर, नर्स आणि मनपाकडे काम करणाºया वैद्यकीय अधिकाºयाला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. मनपाकडे काम करणारे डॉक्टर मजरेवाडी येथील सहारानगरचे रहिवासी आहेत. 

सिव्हिलच्या आयसोलेशन वॉर्डातून रविवारी सर्वाधिक १२ रुग्णांना घरी सोडण्यात आले. त्यामुळे या परिसरात काहीसे आनंदाचे आणि चिंतेचे वातावरण होते. मनपाचे सर्व दवाखाने, छत्रपती शिवाजी महाराज सर्वाेपचार शासकीय रुग्णालयासह राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राबविण्यात येणाºया विविध उपक्रमातील वैद्यकीय अधिकारी १८ तासांहून अधिक काळ कार्यरत आहेत, परंतु डॉक्टर, नर्स आयसोलेशन वॉर्डात दाखल होत असल्याने सहकाºयांमध्ये कुजबुज सुरू झाली होती. आयसोलेशन वॉर्डात दाखल झालेले डॉक्टर, नर्स कोरोनावर लवकरच मात करतील, असा विश्वास त्यांचे सहकारी व्यक्त करीत होते. 

कोरोनामुक्त बारा रुग्ण आनंदात घरी कोरोना आजारातून मुक्त झालेल्या रुग्णांवर डॉक्टर फुले उधळतात; मात्र रविवारी छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात (सिव्हिल) कोरोनामुक्त झालेल्यांनी डॉक्टर, परिचारिका, सफाई कर्मचारी आणि पोलिसांवर फुले उधळली. सिव्हिल हॉस्पिटलमधून रविवारी १० मे रोजी १२ रुग्ण कोरोनामुक्त झाले. त्यापैकी चांगली प्रकृती असणाºया आठ जणांना घरी सोडण्यात आले. तर चार जणांना न्यूमोनिया असल्याने पुढील उपचारासाठी सामान्य वॉर्डात ठेवण्यात आले आहे. घरी सोडण्यात आलेले नागरिक हे रविवार पेठ, नळ बाजार, कुमठा नाका, मोदी, कार्तिक नगर, यशवंत हौसिंग सोसायटी, एसआरपीएफ कॅम्प, फॉरेस्ट या भागातील प्रत्येकी एक जण आहे. शानदार चौक, तालुका पोलीस स्टेशन, घेरडी (ता. सांगोला), नाथ प्राईड येथे राहणारे चार रुग्ण हे न्यूमोनिया आजार असल्याने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पुढील उपचार घेत आहेत.

गुरुवार सात मे पर्यंत एकूण २९ रुग्ण हे कोरोनातून बरे झाले होते. रविवारी १२ रुग्ण बरे झाल्याने आता सोलापुरात कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ही ४१ झाली आहे. बरे झालेल्या रुग्णांना घरी सोडताना पोलीस, डॉक्टर, परिचारिका, सफाई कर्मचारी यांनी टाळ्या वाजवत अभिनंदन केले. तर बरे झालेल्या नागरिकांनी हात जोडत सेवा करणाºया सर्वांचे आभार मानले. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांनी डॉक्टर व इतरांवर फुले उधळल्याने त्याच्या चेहºयावर समाधान दिसत होते. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. औदुंबर मस्के, डॉ. विठ्ठल धडके आदी उपस्थित होते.

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस