One shot dead by gunfire in a land dispute | जमिनीच्या वादातून भाळवणीत गोळ्या झाडून एकाचा खून

जमिनीच्या वादातून भाळवणीत गोळ्या झाडून एकाचा खून

ठळक मुद्देपंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील घटनाघटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखलशेतजमिनीच्या वातावरण घडला प्रकार

पंढरपूर : पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील  ग्रामपंचायतीच्या माजी सदस्यावर गोळी झाडून खून केल्याची घटना दुपारी एकच्या सुमारास घडली आहे. मृत्यू झालेल्या इसमाचे नाव विश्वास उर्फ बापू भागवत (वय ४०, रा. भाळवणी, ता. पंढरपूर) असे आहे.

विश्वास उर्फ बापू भागवत (वय ४०, रा. भाळवणी, ता. पंढरपूर) व विक्रांत म्हमाणे ( रा. भाळवणी) यांच्यामध्ये जमिनीचा कारणावरून वाद होता. रविवारी दुपारी एक वाजता विक्रांत म्हमाणे याने विश्वास भागवत यांच्यावर बंदुकीतून गोळ्या झाडल्या. याबाबत माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ  सागर कवडे यांनी घटनास्थळी भेट दिली.

Web Title: One shot dead by gunfire in a land dispute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.