शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
3
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
4
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
5
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
6
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
7
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
8
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
9
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
10
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
11
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
12
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
13
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
14
UP: बेकायदेशीर औषधाविरुद्ध योगी सरकारची कडक कारवाई; ४ दिवसांत १६ गुन्हे दाखल, २५ दुकानांवर बंदी!
15
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
16
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
17
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
18
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
19
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
20
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा

एक दिवस उपवास करून पूरग्रस्तांना मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2019 13:06 IST

सोलापुरातील सुयश गुरूकुलचा उपक्रम; फळे, सरबताचा आहार घेऊन विद्यार्थ्यांचा स्वयंप्रेरणेने सहभाग

ठळक मुद्देपश्चिम महाराष्ट्रातील क ोल्हापूर, सांगली, मिरज, पंढरपूर आदी भागात पूर आलापूरग्रस्तांना खाण्या-पिण्यासोबतच दैनंदिन वापराच्या वस्तूंची गरजअभ्यास आनंददायी करण्यासाठी विविध प्रकारचे उपक्रम शाळेमध्ये घेण्यात येतात

सोलापूर : आपल्या खिशातील पैसे पूरग्रस्तांना देऊन मदत करण्यापेक्षा त्यांना होणारा त्रास स्वत:ला अनुभवता यावा. तसेच यातून पूरग्रस्तांना मदतही करता येईल, या उद्देशाने सुयश गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी १२ आॅगस्ट रोजी एक दिवस उपवास केला. या ऐच्छिक उपक्रमात सुमारे ८०० विद्यार्थ्यांनी स्वयंप्रेरणेने सहभाग घेतला. उपवासाच्या दिवशी विद्यार्थ्यांनी फळे, ज्यूस, सरबत आदी पदार्थांचा हलका आहार घेतला.

पश्चिम महाराष्ट्रातील क ोल्हापूर, सांगली, मिरज, पंढरपूर आदी भागात पूर आला आहे. यामुळे तेथील पूरग्रस्तांना खाण्या-पिण्यासोबतच दैनंदिन वापराच्या वस्तूंची गरज आहे. तिथे राहणाºया नागरिकांपुढे कोणती परिस्थिती आहे, याची माहिती विद्यार्थ्यांना प्रोजेक्टर व वृत्तपत्र कात्रणाच्या माध्यमातून देण्यात आली. आपण काय करू शकतो, असे विद्यार्थ्यांना विचारल्यावर त्यांनी एक दिवस उपवास करण्याची संकल्पना सांगितली. या उपक्रमात बहुतांश विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. थकवा येऊ नये, यासाठी फळे, ज्यूस, सरबतसारखी पेये तसेच इतर बाबींची सोयही करण्यात आली. ज्या विद्यार्थ्यांना जेवण करायचे आहे त्यांना तशी परवानगी देण्यात आली.

अभ्यास आनंददायी करण्यासाठी विविध प्रकारचे उपक्रम शाळेमध्ये घेण्यात येतात. यासाठी क्षेत्रभेटीचेही आयोजन करण्यात येते. शाळेमध्ये एनसीसीचे निवासी शिबीर घेण्यात येते. यात सुमारे ७०० विद्यार्थ्यांचा सहभाग असतो. या शिबिरात रोप ट्रेनिंग, हॉर्स रायडिंग आदींचे प्रशिक्षण दिले जाते. दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी युवा दिन साजरा करण्यात येतो. विविध क्षेत्रातील मान्यवर मार्गदर्शन करण्यासाठी गुरुकुलमध्ये येत असतात. या उपक्रमांतर्गत करिअरबाबत मार्गदर्शन केले जाते. शाळेतर्फे एक दिवसाच्या सहलीचे आयोजन करण्यात येते. या सहलीमधून विद्यार्थ्यांना शिकण्याची संधी मिळावी यादृष्टीने विविध प्रकल्पांना भेट दिली जाते. पर्यावरणपूरक गणेशोत्सव देखील साजरा करण्यात येतो. अशा विविध प्रकारचे उपक्रम राबविण्यासाठी संस्थेच्या अध्यक्षा सुलभा पिशवीकर, सचिव केशव शिंदे यांचे मार्गदर्शन असते.

पूरग्रस्तांना वही, पुस्तक ांची मदत- सुयश गुरुकुल ही निवासी शाळा असल्याने विद्यार्थी शाळेतच राहतात. या विद्यार्थ्यांनी आपल्याकडे असलेले वही, पुस्तक, पेन आदी शैक्षणिक साहित्यिक तसेच टूथ ब्रश, पेस्ट, चप्पल, बूट, कपडे आदी साहित्य देखील विद्यार्थ्यांनी एकत्रित केले आहेत. आणखी एक ते दोन दिवस असे साहित्य एकत्रित केल्यानंतर पूरग्रस्तांपर्यंत हे पोचविण्यात येणार आहे. गुरुकुलमधील शिक्षक तसेच कर्मचारीदेखील आपले एक दिवसाचे वेतन पूरग्रस्तांना मदत म्हणून देणार आहेत.

सुयश गुरुकुलचा मुख्य उद्देश हा विद्यार्थ्यांना चांगला मनुष्य घडविणे हा आहे. या आधारावरच विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाते. अभ्यासाबरोबरच खेळ व कला यांनाही प्राधान्य देण्याचा आमचा प्रयत्न आहे. यासाठीच शाळेमध्ये १५ प्रकारच्या खेळांचे प्रशिक्षण दिले जाते. तसेच २४ प्रकारच्या विविध कलाही शिकविण्यात येतात. - विद्या शिंदेमुख्याध्यापिका, सुयश गुरुकुल

टॅग्स :SolapurसोलापूरSangli Floodसांगली पूरKolhapur Floodकोल्हापूर पूरSchoolशाळाEducationशिक्षण