रेल्वेखाली उडी मारून एकाची आत्महत्या; पंढरपुरातील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2020 14:18 IST2020-01-09T14:16:16+5:302020-01-09T14:18:48+5:30
आत्महत्या करणारा सांगोल्यातील; सरगम चौकात घडली घटना

रेल्वेखाली उडी मारून एकाची आत्महत्या; पंढरपुरातील घटना
ठळक मुद्दे- पंढरपूर रेल्वे स्टेशन परिसरातील घटना- या घटनेची माहिती मिळताच पंढरपूर पोलीस घटनास्थळी दाखल- घटनास्थळी परिसरातील नागरिकांनी केली मोठी गर्दी
पंढरपूर : कुर्डूवाडी - मिरज यामार्गे धावणाºया रेल्वेखाली सांगोल्यातील एका इसमाने उडी मारून आत्महत्या केल्याची घटना पंढरपुरातील सरगम चौकात गुरुवारी अकराच्या सुमारास घडली आहे.
पंढरपूर येथे रेल्वेखाली एकाने आत्महत्या केली असल्याची माहिती मिळताच पोलीस हेड कॉन्स्टेबल रणजित पाटील, प्रवीण सावंत, सुनील बनसोडे, आराबाज खाटीक त्याचबरोबर रेल्वे पोलीस कर्मचारी बापू गडाहिरे, सीमा जाधव यांनी भेट दिली. आत्महत्या करणाºया इसमाचे नाव जहांगीर नब्बीलाल बागवान (रा. सांगोला) असल्याचे समोर आले. या घटनेची माहिती कळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती.