आजीबाईनं पॉलिश करण्यासाठी दिलेल्या पाटल्या, लॉकेट पळवलं!
By रवींद्र देशमुख | Updated: May 11, 2023 18:04 IST2023-05-11T18:04:20+5:302023-05-11T18:04:53+5:30
रवींद्र देशमुख/सोलापूर सोलापूर : वृध्द महिला एकटी घरी असल्याची संधी साधत दोन चोरट्यांनी त्यांचे चार तोळे वजनाचे सोन्याचे ...

आजीबाईनं पॉलिश करण्यासाठी दिलेल्या पाटल्या, लॉकेट पळवलं!
रवींद्र देशमुख/सोलापूर
सोलापूर : वृध्द महिला एकटी घरी असल्याची संधी साधत दोन चोरट्यांनी त्यांचे चार तोळे वजनाचे सोन्याचे दागिने पॉलिश करून देण्याच्या बहाण्याने पळून नेल्याची घटना गडली आहे. याबाबत जयश्री पुंडलिक माने ( वय ७४, रा. मार्केंडेय नगर) यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादी माने या बुधवारी दुपारी घरात एकट्या असताना दोन अनोळखी इसम त्यांच्या घराजवळ येऊन भांडी पॉलिश करून देतो असे सांगून त्यांच्या जवळ आले. यानंतर फिर्यादीच्या हातातील पाटल्या पाहून पॉलिश करून देतो असे सांगत विश्वास संपादन करून घेतला. यानंतर त्यांच्या गळ्यातील लॉकेट घेतले आणि घराबाहेर पळून गेले.
या प्रकरणी जयश्री माने यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून अज्ञात अज्ञात दोन चोरांवर गुन्हा दाखल झाला आहे. घटनेचा तपास पोसई रजपूत करत आहेत.