अरे बाप रे; मित्रांसोबत सोडा प्यायला गेला अन् इकडं गाडी गेली चोरीला

By Appasaheb.patil | Updated: September 5, 2022 16:07 IST2022-09-05T16:07:09+5:302022-09-05T16:07:17+5:30

दक्षिण सोलापूर तालुक्यातील कंदलगावातील घटना

Oh Father Ray; Went to drink soda with friends and stole a car | अरे बाप रे; मित्रांसोबत सोडा प्यायला गेला अन् इकडं गाडी गेली चोरीला

अरे बाप रे; मित्रांसोबत सोडा प्यायला गेला अन् इकडं गाडी गेली चोरीला

सोलापूर : दहा ते वीस रुपयांचा सोडा पिणे किती महागात पडू शकते, हे कंदलगाव (ता. द. सोलापूर) येथे घडलेल्या एका घटनेवरून समोर आले.

दरम्यान, त्याचे झाले असे की, गुरूप्रसाद निरंजन स्वामी (वय २२, रा. कंदलगाव, ता. द. सोलापूर) हा कंदलगाव बसस्थानकजवळ असलेल्या सय्यद बेकरीसमोर दुचाकी क्रमांक (एमएच १३, सीएन ७६२०) ही लावून बेकरीच्या बाजूला मित्रासोबत सोडा पित थांबला होता. त्यानंतर काहीवेळाने सोडा पिऊन गाडी ठेवलेल्या ठिकाणी आला असता, गाडी जागेवर नव्हती. यानंतर आजूबाजूला चौकशी केली असता गाडीबाबत काहीही माहिती मिळू शकली नाही. आपली गाडी चोरीला गेल्याचे लक्षात येताच गुरूप्रसाद याने मंद्रुप पोलीस ठाण्यात याविषयीची फिर्याद दिली. मंद्रुप पोलिसांनी अज्ञाताविरोधात दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस नाईक बुरजे करत आहेत.

Web Title: Oh Father Ray; Went to drink soda with friends and stole a car