Beraking; आता कोरोनाबाधित व्यक्तीचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2020 12:18 IST2020-08-13T12:16:24+5:302020-08-13T12:18:21+5:30

सोलापूर महापालिकेचे निर्देश; मृतदेह घरी न नेता थेट स्मशानभूमीत घेऊन जावा लागणार

Now the body of the person affected by the coronation will be in the possession of the relatives | Beraking; आता कोरोनाबाधित व्यक्तीचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात मिळणार

Beraking; आता कोरोनाबाधित व्यक्तीचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात मिळणार

ठळक मुद्देनातेवाईकांनी पीपीई किट घालून आणि चार ते पाच व्यक्तींच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करावेत मृतदेह घरी घेऊन जाण्यास मनाई असेल, असेही पांडे यांनी सांगितलेअलीकडच्या काही दिवसांत मृतदेह मिळावा, यासाठी नातेवाईकांकडून आग्रह

सोलापूर : कोरोनाबाधित व्यक्तीचा मृतदेह आता नातेवाईकांच्या ताब्यात मिळणार आहे. परंतु, नातेवाईकांना मृतदेह घरी न नेता थेट स्मशानभूमीत घेऊन जावा, असे निर्देश गुरुवारी जाहीर करण्यात येतील, असे उपायुक्त धनराज पांडे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

कोरोनाबाधित मृतदेहांवर महापालिका, नगरपालिका यांच्याकडून अंत्यसंस्कार केले जात आहेत. मात्र अलीकडच्या काही दिवसांत मृतदेह मिळावा, यासाठी नातेवाईकांकडून आग्रह केला जात आहे. त्यानुसार निर्देशाची पडताळणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहेत.

नातेवाईकांनी पीपीई किट घालून आणि चार ते पाच व्यक्तींच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करावेत. मृतदेह घरी घेऊन जाण्यास मनाई असेल, असेही पांडे यांनी सांगितले. गुरुवारी याबाबत अधिकचे स्पष्टीकरण दिले जाणार आहे. 

Web Title: Now the body of the person affected by the coronation will be in the possession of the relatives