शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
3
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
4
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
5
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
6
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
7
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
8
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
9
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
10
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
11
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
12
'सिंघम 3' च्या सेटवरुन अजय देवगण-जॅकी श्रॉफचा फाईट सीन लीक, व्हिडीओ व्हायरल
13
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
14
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
15
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
16
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
17
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
18
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
19
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
20
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 

सोलापूर बाजार समिती अपहार प्रकरणी दिलीप मानेंसह ३३ जणांना नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2018 4:16 PM

सोलापूर बाजार समिती : ३३ संचालक व दोन सचिवांना १३ जुलैपर्यंत खुलासा देण्याची मुदत 

ठळक मुद्देतत्कालीन संचालकांवर पोलिसात गुन्हाही दाखलपाच वर्षांत तसेच १६-१७ या वर्षाच्या कामकाजाचे फेरलेखा परीक्षण३१ संचालक व दोन सचिवांना जिल्हा उपनिबंधकांनी नोटिसा बजावल्या

सोलापूर: विशेष लेखापरीक्षण अहवालानुसार  सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ३९ कोटी ५३ लाख ६९ हजार १५५ रुपये आर्थिक नुकसानीस वैयक्तिक व सामूहिक जबाबदारी निश्चित करण्यासाठी  कलम ५७/४ अन्वये तत्कालीन ३१ संचालक व दोन सचिवांना जिल्हा उपनिबंधकांनी नोटिसा बजावल्या आहेत. १३ जुलै रोजी त्यांना म्हणणे मांडण्याची संधी देण्यात आली आहे.

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या २०११-१२ ते १५-१६ या पाच वर्षांत तसेच १६-१७ या वर्षाच्या कामकाजाचे फेरलेखा परीक्षण करण्यात आले आहे. बाजार समितीचे प्रशासक सुरेश काकडे यांनी फेरलेखापरीक्षण करून तत्कालीन संचालक मंडळावर १६ मुद्यांवर आधारित ३९ कोटी ५३ लाख ६९ हजार १५१ रुपये ६० पैशाचे नुकसान केल्याचा ठपका ठेवला आहे.

या अहवालाच्या आधारे तत्कालीन संचालकांवर पोलिसात गुन्हाही दाखल केला आहे; मात्र सहकारी अधिनियमानुसार लेखापरीक्षणातील रकमेची जबाबदारी निश्चित करण्याची कारवाई जिल्हा उपनिबंधकाकडून सुरू आहे.  फेरलेखापरीक्षणात १६ मुद्यांवर संचालकांना जबाबदार धरले आहे. यामध्ये आर्थिक नुकसानीची रक्कम ३१ कोटी २१ लाख ०४ हजार ४२३ रुपये ९२ पैसे व त्यावरील १२ टक्के व्याज ८ कोटी ३२ लाख ६४ हजार ७१८ रुपये ६८ पैसे अशी एकूण ३९ कोटी ५३ लाख ६९ हजार १५१ रुपये ६० पैशाचे नुकसान केल्याचा ठपका ठेवला आहे.

 बांधकाम ठेकेदारांनी वेळेत कामे पूर्ण केली नसताना दंड न करता मुदतवाढ दिल्याने ४३ लाख ६८ हजार ९३० रुपये, प्रक्रिया विभागातील जागेचा गैरवापर केल्याने ५ कोटी ३१ लाख २८ हजार २३५ रुपये, ब्रह्मदेवदादा माने बँकेत ठेवी ठेवल्याने ८३ लाख २३ हजार ७६२ रुपये, नियमबाह्य कर्मचारी भरतीमुळे ५ कोटी १ लाख ६ हजार ६३० रुपये, बाजार शुल्क व देखरेख फी विलंबाने जमा केलेल्या व्यापाºयांकडून दंड आकारणी न केल्याने दोन कोटी ७७ लाख ३७ हजार ६४४ रुपये, व्यापाºयांनी परत केलेले गाळे लिलाव न करता वाटप केल्याने ७१ लाख ८७ हजार ५५६ रुपये या अन्य १६ मुद्यांवर आपण दोषी असल्याचे संचालक व सचिवांना बजावलेल्या नोटिसीमध्ये म्हटले आहे.

नोटिसीमध्ये आपणाला २३ मुद्यांच्या अनुषंगाने बाजार समितीत झालेल्या नुकसानीस आपणाला वैयक्तिक व सामूहिकरित्या जबाबदार धरुन सदर रक्कम वसूल करण्यासाठी महाराष्टÑ कृषी उत्पन्न खरेदी विक्री (विकास व विनियमन)अधिनियम १९६३ चे कलम ५७ मधील तरतुदीनुसार कार्यवाही का करण्यात येऊ नये याचा खुलासा सादर करावा असे म्हटले आहे. १३ जुलै रोजी याबाबतचा खुलासा सादर करण्याबाबत म्हटले आहे.

 यांना बजावल्या नोटिसा- च्इंदुमती परमानंद अलगोंडा, बाळासाहेब शेळके, महादेव चाकोते, दिलीप माने, नागराज पाटील, शंकर येणेगुरे, शिवानंद चिडगुंपी, उर्मिला रावसाहेब शिंदे, अविनाश मार्तंडे, रजाक शेख अहमद निंबाळे, डी.एन.(धोंडिराम) गायकवाड, महादेव पाटील, आप्पासाहेब उंबरजे, प्रभाकर विभुते, दगडू जाधव, राजशेखर शिवदारे, केदार विभुते, राजेंद्र गुंड, प्रवीण देशपांडे, सिद्धाराम चाकोते, सोजर पाटील, शोभाताई जगन्नाथ होनमुर्गीकर, उत्तरेश्वर भुट्टे, अशोक देवकते, पिरप्पा म्हेत्रे, श्रीशैल गायकवाड, चंद्रकांत खुपसंगे, नसिर अहमद खलिफा, बसवराज दुलंगे, हकीम महमद शेख, सिद्रामप्पा यारगले, सचिव धनराज कमलापुरे व उमेश दळवी. 

टॅग्स :SolapurसोलापूरAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीElectionनिवडणूकPoliceपोलिसCrimeगुन्हा