शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

'उत्तर'मध्य देशमुख विरोधक सक्रिय

By admin | Updated: September 23, 2014 14:22 IST

भाजपचे शहर उत्तरमधील विद्यमान आ. विजयकुमार देशमुख यांनी भाजपच्या नगरसेवकांमध्ये भांडणे लावली.

सोलापूर : भाजपचे शहर उत्तरमधील विद्यमान आ. विजयकुमार देशमुख यांनी भाजपच्या नगरसेवकांमध्ये भांडणे लावली. पक्ष वाढविण्याऐवजी शहर उत्तर पुरताच पक्ष र्मयादित ठेवला त्यामुळे त्यांच्याऐवजी अन्य कोणालाही उमेदवारी द्यावी अशी एकमुखी मागणी आमदार विरोधी गटाने अथर्व गार्डनमधील मेळाव्यात केली. यावेळी देशमुखांवर अनेक आरोप करण्यात आले. 
भाजपमध्ये गेल्या दीड ते दोन वर्षांपासून दोन गट पडले असून एका गटाने आ. देशमुखांना थेट विरोध सुरू केला आहे. सोमवारी सायंकाळी झालेल्या मेळाव्यात नगरसेवक सुरेश पाटील, जगदीश पाटील, मोहिनी पतकी, श्रीकांचना यन्नम, रोहिणी तडवळकर, नरसूबाई गदवालकर, नागेश वल्याळ, पांडुरंग दिड्डी, सुरेखा अंजीखाने या विद्यमान नगरसेवकांसह भाजपचे माजी शहराध्यक्ष रामचंद्र जन्नू, राम तडवळकर, देवानंद अंजीखाने,बंडू कुलकर्णी, श्रीपाद घोडके, राजू हौशेट्टी, बाबुराज जमादार, प्रकाश पात्रे यांच्यासह सुमारे हजार कार्यकर्ते उपस्थित होते. 
शहर उत्तर मतदारसंघातून नागेश वल्याळ, जगदीश पाटील, सुरेश पाटील, मोहिनी पतकी, रोहिणी तडवळकर आदींसह १८ जणांनी लढण्याची इच्छा यावेळी व्यक्त केली. या १८ मधून सुरेश पाटील यांना उमेदवारी द्यावी आणि तेही नको असतील तर सुभाष देशमुख, विवेक घळसासी, किशोर देशपांडे यांच्यापैकी कोणालाही उमेदवारी द्यावी आम्ही पक्षाचे काम प्रामाणिकपणे करु असे यावेळी अनेकांनी भाषणात सांगितले. 
आ. देशमुखांनी सुरेश पाटील-हिरेमठ, नागेश वल्याळ- राजू पाटील, शिवानंद पाटील- श्रीकांचना यन्नम, संजय कोळी- गदवालकर यांच्यात भांडणे लावली. पदाधिकार्‍यांची दोन वर्षांपासून निवड केली नाही. अपक्ष, भाजप, शिवसेना, काँग्रेस, जनसुराज्य आदी अनेक पक्षातून आलेल्या बाळू पाटील यांना पुन्हा पक्षात घेतले अशी टीका सुरेश पाटील यांनी यावेळी केली. (प्रतिनिधी) 
पक्ष विकल्याची टीका 
■ विधानपरिषद निवडणुकीच्या वेळी आमदार विजयकुमार देशमुख यांनी दीपक साळुंखे यांच्याशी आर्थिक व्यवहार करून प्रत्येक नगरसेवकांना ५ लाख मिळवून दिले. यातील २ लाख नगरसेवकांना दिले तर उर्वरित ३0 लाख रुपये जनता बँकेत 'एफडी' करून ठेवले आहेत. असा व्यवहार केल्यामुळे भाजपचे त्यावेळचे उमेदवार रामचंद्र जन्नू यांना अवघी ४ मते पडली हे सर्वांना माहिती आहे त्यामुळे अशा आ. देशमुखांना पुन्हा उमेदवारी देऊ नये अशी मागणी यावेळी नगरसेवक जगदीश पाटील यांनी केली.