No one will come after Khadse and what will they get? | एकनाथ खडसेंच्या पाठीमागे कोणी येणार नाही अन् त्यांना काय मिळणार नाही

एकनाथ खडसेंच्या पाठीमागे कोणी येणार नाही अन् त्यांना काय मिळणार नाही

पंढरपूर :  एकनाथ खडसे भाजप सोडून गेले आहेत. रिपाइंमध्ये या असे आवाहन केले होते. परंतु त्यांच्या पाठीमागे राष्ट्रवादीत कोणी जाणार नाही़ अन् गेलेच तर त्यांना काय मिळणार नाही असे विधान केंद्रीय सामाजिक व न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले़

चंद्रभागा नदीपात्रा जवळील घाट कोसळल्याने मयत झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबांची भेट घेण्यासाठी केंद्रीय सामाजिक व न्याय राज्यमंत्री  रामदास आठवले पंढरपूरला आले होते. यावेळी प्रसार माध्यम प्रतिनिधींशी त्यांनी संवाद  साधला. यावेळी राजाभाऊ सरवदे, सुनील सर्वगोड, बाळासाहेब कसबे, कितीर्पाल सर्वगोड, जितेंद्र बनसोडे उपस्थित होते.

मनसे प्रमुख राज ठाकरे यांना जवळ करण्याचा प्रश्नच येत नाही. त्या उलट राज ठाकरे यांना जवळ केले तर भाजपचे मतदार कमी होतील असेही आठवले म्हणाले़. अभिनेत्री कंगना राणावत ही राष्ट्र विरुद्ध बोलल्याने न्यायालयाने तिच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. तिच्या वक्तव्याशी आम्ही सहमत नसल्याचे केंद्रीय सामाजिक व न्याय राज्यमंत्री  रामदास आठवले यांनी सांगितले.

Web Title: No one will come after Khadse and what will they get?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.