शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

संचारबंदीची गरज नाही; सोलापुरात टाळेबंदी नको.. जमावबंदी हवी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2020 14:24 IST

उपासमार होईल; लॉकडाऊन, संचारबंदीपेक्षा अन्य पर्यायांचा विचार करावा; शहरात वावरण्यासाठीचे नियम कडक करावेत

ठळक मुद्देलॉकडाऊनमध्ये बंद पडलेले स्वयंपाक घरातील मिक्सरचे भांडे दुरूस्त झालेघरातील आजारी माणसाला दवाखान्यात, हॉस्पिटलमध्ये पोहोचविणे सुलभ झालेशहरातील  पन्नास हजार महिला कामगारांची रोजीरोटी सुरू झाली

रवींद्र देशमुख 

सोलापूर : कोरोना महामारीने शहरात कहर केला आहे. दररोज रूग्णांची संख्या वाढत आहे. या स्थितीत काळजी घेणे सर्वांचे कर्तव्य आहे; पण उपाययोजना म्हणून आता टाळेबंदीचा पर्याय सोडून द्यावा. त्याऐवजी कठोर जमावबंदी करावी, अशी मागणी सोलापूरकरांकडून होत आहे.

पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शनिवारच्या सोलापूर दौºयात संचारबंदी लागू करण्याचे सूतोवाच केले होते. त्यामुळे सर्वसामान्य सोलापूरकर हवालदिल झाले आहेत. अनेकजणांनी शनिवारी संचारबंदीच्या भीतीने बाजारपेठांमध्ये गर्दी करून जीवनावश्यक वस्तही खरेदी केल्या.

लॉकडाऊनच्या साडेतीन महिन्याच्या कालावधीनंतर जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून अनलॉक - १ त्यानंतर अनलॉक -२ झाले. त्यामुळे व्यापार, व्यवसायाची गाडी रूळावर येऊ लागली. कष्टकºयांच्या हाताला काम मिळाले. त्यामुळे सोलापूरकरांची सोयही झाली. लॉकडाऊनमध्ये बंद पडलेले स्वयंपाक घरातील मिक्सरचे भांडे दुरूस्त झाले. घरातील आजारी माणसाला दवाखान्यात, हॉस्पिटलमध्ये पोहोचविणे सुलभ झाले. अनलॉक झाल्यानंतर सुरूवातीचे काही दिवस विडी कारखाने सुरू झाले नाहीत; पण त्यानंतर तेही सुरळीत सुरू झाले. शहरातील  पन्नास हजार महिला कामगारांची रोजीरोटी सुरू झाली.

याशिवाय सलून आणि पार्लरचा व्यवसाय सुरू झाल्यामुळे शहरवासीयांना सुविधा मिळाली आणि तेथील चालक, कामगारांच्या हाताला काम मिळाले. आता जर पुन्हा लॉकडाऊन झाले. तर शहरातील सर्वच व्यापार, व्यवसाय ठप्प होतील. लोक पुन्हा बेरोजगार होतील. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने संचारबंदी किंवा लॉकडाऊनचा निर्णय घेताना सारासार विचार करावा, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली.जिल्हा प्रशासन जो काही निर्णय घेत आहे. तो शहरवासीयांना या महाभयानक रोगापासून दूर ठेवण्यासाठीच आहे; पण ही सोलापूरकरांचीही जबाबदारी आहे. त्यांनी नियमांचे पालन करून वावर करायला हवा. मास्कचा वापर करावा, डबलसीट दुचाकी प्रवास पाळावा, फिजिकल डिस्टन्स ठेवावे, असेही अनेकांनी सांगितले.

लॉकडाऊनची गरज नाही !२३ मार्चपासून ३ जूनपर्यंत केलेल्या लॉकडाऊनच्या काळात  शहरातील अनेक उद्योगधंदे, व्यवसाय, व्यापार आणि रोजगारावर परिणाम होऊन शहराचे अर्थचक्र पूर्णपणे बंद होते. आता पुन्हा लॉकडाऊन केल्यानंतर सामान्य नागरिकांचे जीवन उद्ध्वस्त होईल, त्यामुळे शहरात पुन्हा लॉकडाऊनची गरज नाही, असे वेकअप सोलापूर फाउंडेशनच्या वतीने निवेदनाद्वारे पालकमंत्र्यांकडे मागणी केली. 

आमचा विरोधगेली तीन महिने लॉकडाऊनमुळे हॉटेल, दुकानामध्ये काम करणारे कामगार बेकार झाले आहेत. संचारबंदीमुळे त्यात आणखी भर पडेल. त्यामुळे त्यांच्या पोटापाण्याची व्यवस्था कोण करणार. संचारबंदी करून संसर्ग कमी होणार आहे काय? चाचण्या वाढविणे, अलगीकरण करणे अशा उपाययोजना प्रभावीपणे करण्याची गरज आहे.- मनोहर सपाटे, प्रवक्ते राष्ट्रवादी काँग्रेस

संचारबंदी परवडणारी नाही!संचारबंदी आता परवडणारी नाही. सोलापूर कामगारांचे शहर आहे. आतापर्यंतच्या लॉकडाऊनमुळे जगण्याचा आधार हिसकावून घेतला गेला आहे. व्यापार थांबला आहे. वाजंत्री, पेंटर अशा छोट्या हातावर पोट असणाºयांचा संसार संकटात आहे. त्यामुळे अशात पुन्हा संचारबंदीला आमचा कडाडून विरोध आहे. जिथे रुग्ण आढळतात तेथे प्रतिबंध करावा.- आनंद चंदनशिवे, प्रवक्ते, बहुजन वंचित आघाडी 

भविष्य अंधारात जाईलसंचारबंदी लागू केल्यास भाजीवाल्यांचे जेवणाचेही वांदे होतील. आमचे यातूनच उत्पन्न मिळत असते, ते जर बंद झाले तर आमच्यावर उपासमारीची वेळ येईल. जर उत्पन्न बंद झाले तर मुलांचे भविष्य हे अंधारातच राहील.जर आता संचारबंदी लागू केली तर भाजीवाल्यांसह अनेक लघुउद्योजकांच्या जगण्या मरण्याचा प्रश्न निर्माण होईल.-अशोक राठोड, भाजी विक्रेते 

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिसSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय