धक्कादायक; सोलापूरचे न्युरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर यांची आत्महत्या; डोक्यात झाडली गोळी

By आप्पासाहेब पाटील | Updated: April 18, 2025 22:50 IST2025-04-18T22:49:56+5:302025-04-18T22:50:22+5:30

वळसंगकर सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल येथे उपचार सुरु असताना त्यांची अखेरची झुंज अयशस्वी ठरली. 

Neurosurgeon Dr Shirish Valsangkar end his life shot himself in the head | धक्कादायक; सोलापूरचे न्युरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर यांची आत्महत्या; डोक्यात झाडली गोळी

धक्कादायक; सोलापूरचे न्युरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर यांची आत्महत्या; डोक्यात झाडली गोळी

सोलापूर : सोलापुरातील प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात गोळी झाडली. त्यांच्यावर मोदी येथील त्यांच्याच वळसंगकर सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल येथे उपचार सुरु असताना त्यांची अखेरची झुंज अयशस्वी ठरली. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, डॉ. शिरीष वळसंगकर यांनी मोदी, सोनमाता शाळेजवळील त्यांच्या निवासस्थानी रात्री साडेआठच्या सुमारास स्वतःच्या डोक्यात गोळी मारून घेतली. त्यानंतर त्याच अवस्थेत कुटुंबियांनी तातडीने त्यांचे स्वतःचे हॉस्पिटल असलेल्या मोदी स्मशानभूमी जवळील वळसंगकर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे. सुरुवातीला त्यांचे प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे सांगण्यात आले. मात्र शुक्रवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास त्यांचे निधन झाल्याचे सांगण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच सोलापूर शहर पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.  या घटनेने सोलापूरच्या वैदिक क्षेत्रात मोठी खळबळ निर्माण झाली आहे. डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतः च्या डोक्यात गोळी का झाडून घेतली याचा आता पोलीस शोध घेत आहेत.

Web Title: Neurosurgeon Dr Shirish Valsangkar end his life shot himself in the head

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.