शहरं
Join us  
Trending Stories
1
CM देवेंद्र फडणवीस आणि मनसे प्रमुख राज ठाकरे एकाच मंचावर येणार; दोघांची भेट लक्षवेधी ठरणार
2
दिल्लीत स्फोटापूर्वी मशिदीत गेला होता दहशतवादी डॉ. उमर नबी; स्फोटाच्या आधीचे सीसीटीव्ही समोर
3
अल-कायदाचा माजी कमांडर; व्हाईट हाऊसमध्ये अल-शरा आणि डोनाल्ड ट्रम्प यांची ऐतिहासिक भेट
4
“बूट फेकीसारख्या घटना पुन्हा घडू नये यासाठी काय उपाय करता येईल?”; सुप्रीम कोर्टाचा सवाल
5
'या' सरकारी बँकेचा ग्राहकांना मोठा दिलासा; घर घेण्याच्या विचारात असाल तर, पाहा काय आहेत नवे दर?
6
Delhi Blast : व्हाईट कॉलर टेरर मॉड्यूल! दिल्ली स्फोट प्रकरणात आणखी एका डॉक्टरला घेतलं ताब्यात
7
PAK vs SL: पाकिस्तानात स्फोट, श्रीलंकन क्रिकेटर मायदेशी परतण्याची भीती, PCBचा मोठा निर्णय
8
Delhi Blast: दिल्ली बॉम्बस्फोटातील कारची ११ वर्षात ५ वेळा विक्री; खरा मालक कोण, शेवटचा व्यवहार कधी झाला?
9
नगरपरिषद निवडणुकीत नवी समीकरणे; बहुजन विकास आघाडी अन् मनसेची युती होणार? नेते म्हणाले...
10
Children's Day 2025: सुकन्या समृद्धी ते म्युच्युअल फंड SIP पर्यंत; बालदिनी तुमच्या मुलांना द्या खास आर्थिक गिफ्ट, जाणून घ्या स्कीम्स
11
बॉलिवूडच्या 'भट' कुटुंबात कटुता!, आलियाने सख्ख्या काकाला बोलवलं नाही लग्नाला अन् राहालाही नाही भेटवलं, मुकेश भट यांचा खुलासा
12
अंजली दमानियांकडून राजीनाम्याची मागणी; मला योग्य वाटेल ते मी करेन, अजित पवारांची प्रतिक्रिया
13
'अमेरिकन कामगारांना ट्रेन करा आणि घरी जा...' ट्रम्प प्रशासनाचं नवीन फर्मान; भारतीय IT अभियंते चिंतेत
14
६ डिसेंबरला करायचा होता स्फोट, पण अटकसत्रामुळे उधळला कट, ‘कार बॉम्ब’ची सुरू होती तयारी, नेटवरून घेतले धडे
15
"हिंदीतील लॉबीने मला स्वीकारलं नाही...", अजिंक्य देव स्पष्टच बोलले; अजय-सनीचं घेतलं नाव
16
डरानेवालो को डराओ! 'शिवतीर्थ'समोर बॅनरबाजी; उत्तर भारतीय सेनेने मनसे प्रमुख राज ठाकरेंना डिवचलं
17
KL Rahul: द.आफ्रिकेविरुद्ध केएल राहुल इतिहास रचणार? मोठ्या विक्रमापासून फक्त १५ धावा दूर!
18
पार्थ पवारांच्या कंपनीकडून आणखी एक फसवणूक; जमीन खरेदीचा १४७ कोटींचा नजराणाही बुडवला
19
कर्मचाऱ्यांना दररोज ऑफिसला येण्याचा आदेश, ६०० जणांनी राजीनामा दिला; कंपनीला बसला ₹१,५३५ कोटींचा फटका
20
२० क्विंटल स्फोटकांची खरेदी अन् पैशांवरुन वाद; ४ शहरांमध्ये IED हल्ला करण्याचा होता दहशतवाद्यांचा प्लॅन

स्वराज्य रक्षणासाठी जिभेवर नियंत्रणाची गरज, सोलापूर मध्यवर्ती शिवजन्मोत्सव मंडळाचे अध्यक्ष रसुल पठाण यांचे मत, स्वराज्य स्थापनेत मुस्लिमांचे योगदान मोलाचे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 16:04 IST

छत्रपती शिवरायांनी स्वराज्य स्थापनेसाठी दुष्मनांशी लढा देताना तलवारीचा वापर केला. त्याच शिवरायांचे हे स्वराज्य सांभाळण्यासाठी आज केवळ जिभेवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे.

ठळक मुद्देसोलापूरच्या इतिहासात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती एका मुस्लीम कार्यकर्त्याच्या अध्यक्षतेखाली साजरी होतेय यंदा प्रथमच शिवरायांचे १९ मुस्लीम शिलेदारांचा पेहराव केलेल्या तरुणांची मिरवणूक काढण्यात येणार आहे

बाळासाहेब बोचरे सोलापूर दि १६ : छत्रपती शिवरायांनी स्वराज्य स्थापनेसाठी दुष्मनांशी लढा देताना तलवारीचा वापर केला. त्याच शिवरायांचे हे स्वराज्य सांभाळण्यासाठी आज केवळ जिभेवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. केवळ विषारी प्रचारामुळे जातीय सलोखा कलुषित केला जातो, याला कुठेतरी पायबंद बसला पाहिजे, असे प्रतिपादन मध्यवर्ती शिवजन्मोत्सवचे अध्यक्ष रसूल पठाण यांनी केले. सोलापूरच्या इतिहासात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती एका मुस्लीम कार्यकर्त्याच्या अध्यक्षतेखाली साजरी होतेय याचा मला अभिमान वाटतो, असे ते पुढे म्हणाले. छत्रपती शिवराय हे जाती-पातीपलीकडचे राजे होते. त्यांचा लढा मुघल साम्राज्याविरुद्ध असला तरी मुस्लीम समाजातील १९ शिलेदार त्यांच्या फौजेत होते. त्यांचे योगदान लाखमोलाचे होते हे आजही कोणी नाकारत नाही. या राजाबद्दल मुस्लीम समाजामध्येही कधी अनादराची भावना नव्हती आणि नाही. पण शिवजयंती साजरी करण्याची संधी आम्हाला कधी मिळाली नाही. मराठा समाजातील नेत्यांनी एकत्र येऊन एक जाती-पातीपलीकडे जाऊन विचार करणारा निर्व्यसनी तरुण म्हणूनच माझी एकमताने अध्यक्षपदी निवड केली. ही बाब माझ्यासाठी अभिमानाची आहे, तसेच शिवप्रेमींचा मनाचा मोठेपणा दर्शवणारी आहे. आपली अध्यक्षपदी निवड का झाली असे वाटते? या प्रश्नाला उत्तर देताना रसूलभाई म्हणाले, लष्कर परिसरामध्ये जातीय सलोखा ठेवण्यात आपण मोलाचे योगदान दिले आहे. गरिबी जवळून पाहिल्याने व भोगल्याने पैशाची मस्ती कधी दाखवलीच नाही. आमचा शाब्दी सोशल ग्रुप तयार झाला आहे. त्यामुळे लष्कर मध्यवर्ती गणेश मंडळाच्या अध्यक्षपदी माझी निवड झाली. आम्ही अनेक चांगले बदल केले आहेत. गुलालाऐवजी फुलांची उधळण करणे, अन्नदान, पाणी वाटप असे सामाजिक उपक्रम राबवले. त्यामुळे आपली शिवजन्मोत्सव मध्यवर्ती मंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाली. मराठा समाजातील दास शेळके, नाना काळे, राजन जाधव या प्रमुख नेत्यांनी आपल्या नावाची शिफारस केली अन् त्याला एकमताने मंजुरी मिळाली.---------------------------मुस्लीम शिलेदारांचा पेहराव केलेल्या युवकांची मिरवणूक- अध्यक्ष या नात्याने आपणाला शिवजयंती उत्सवात काही बदल करावा वाटतो का किंवा करणार का असे विचारता रसूलभाई म्हणाले, परंपरा मोडता येत नाहीत आणि जनतेला त्रास होणार नाही, असा मधला मार्ग काढावाच लागतो. अलीकडे डॉल्बीचे फॅड आले आहे. ते आम्हाला अजिबात मान्य नाही. शिवरायांच्या काळात निरोप किंवा सांकेतिक संदेश म्हणून तोफांचे बार किंवा गवताच्या गंजी पेटवल्या जायच्या, आज त्याची गरज राहिली नाही. जल्लोष साजरा करण्याची पद्धतही बदलली पाहिजे. यंदा प्रथमच शिवरायांचे १९ मुस्लीम शिलेदारांचा पेहराव केलेल्या तरुणांची मिरवणूक काढण्यात येणार आहे. शिवाय रहीम शेख या तरुणाचे व्याख्यान होणार आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज