शहरं
Join us  
Trending Stories
1
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
2
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
3
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
4
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
5
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
6
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
7
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
8
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
9
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
10
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
11
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
12
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
13
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
14
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
15
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
16
भारत पाकिस्तानविरुद्ध ६ ऑक्टोबरला भिडणार
17
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
18
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

पवारांच्या राजकीय शिष्यासाठी ‘राष्ट्रवादी’चे आजी-माजी नेते सक्रिय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2019 12:07 PM

सोलापूर लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आजी-माजी पदाधिकारी लागले कामाला

ठळक मुद्देसुशीलकुमार शिंदे यांच्यासाठी शरद पवारांनी दोन जाहीर सभा घेतल्यासोलापूर लोकसभा मतदारसंघातील लढत तिरंगी असल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी बेरजेच्या समाजकारणाला प्राधान्य द्यावेज्येष्ठ नेते बळीराम साठे यांनी उत्तर सोलापूर तालुक्यातील काँग्रेसला मताधिक्य देण्याची पैजही लावली

राकेश कदम 

सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आपले राजकीय गुरु असल्याचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे नेहमीच सांगतात. पवार यांच्या राजकीय शिष्यासाठी राष्ट्रवादीचे सर्व कार्यकर्ते नेटाने कामाला लागले आहेत. काँग्रेसच्या तुलनेत शहरात राष्ट्रवादीची संघटनात्मक शक्ती कमी असली तरी प्रचार यंत्रणा काँग्रेस इतकीच प्रभावी  ठरली आहे.

सुशीलकुमार शिंदे यांच्यासाठी शरद पवारांनी दोन जाहीर सभा घेतल्या. सोलापूर लोकसभा मतदारसंघातील लढत तिरंगी असल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी बेरजेच्या समाजकारणाला प्राधान्य द्यावे, असा कानमंत्र दिला. त्यानुसार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष भारत जाधव, कार्याध्यक्ष संतोष पवार, शहरातील विविध समाज घटकांना शिंदे यांच्यासोबत जोडण्याचे काम करीत आहेत. शहरातील विस्कळीत पाणी पुरवठ्याच्या मुद्यावरुन नगरसेवक रान पेटवित आहेत. त्यांच्या मदतीला  माजी महापौर मनोहर सपाटे, युन्नूस शेख, महेश गादेकर, नाना काळे, महिला आघाडीच्या अध्यक्षा सुनिता रोटे, युवक अध्यक्ष जुबेर बागवान, ओबीसी सेलचे अध्यक्ष दिलावर मणियार, अल्पसंख्याक सेलचे राजू कुरेशी, फारुक मटकी, व्हिजेएनटी सेलचे संजय सरवदे, महंमद इंडिकर, विधी सेवा सेलचे हरिभाऊ पवार, अंकलगी, बाबासाहेब जाधव यांच्याकडूनही मदत होत असल्याचे पाहायला मिळाले. 

ज्येष्ठ नेते बळीराम साठे यांनी उत्तर सोलापूर तालुक्यातील काँग्रेसला मताधिक्य देण्याची पैजही लावली असून त्याची सर्वाधिक चर्चा आहे. मोहोळ राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असल्याने काँग्रेसला येथून मताधिक्याची अपेक्षा आहे. मोहिते-पाटलांच्या भाजप प्रवेशामुळे पंढरपूर, मंगळवेढ्यात राष्ट्रवादीला फटका बसला असला तरी जुने कार्यकर्ते सक्रिय आहेत.  दक्षिण सोलापूर तालुक्यात पूर्वीप्रमाणे मोजके काम सुरू आहे. 

तरुणांचा उत्साह चांगलाकाँग्रेस-राष्ट्रवादीचे लोक एकाच कुटुंबातील सदस्य आहेत. सर्वजण एकदिलाने काम करीत आहे. तरुणांचा उत्साह तर चांगला आहे. ज्येष्ठ नेते या कार्यकर्त्यांना चांगली मदत करीत असल्याचे पाहायला मिळते. - सुशीलकुमार शिंदे, काँग्रेस

लोकशाहीसाठी ही निवडणूक महत्त्वाचीलोकशाही टिकविण्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे. या निवडणुकीत समाजातील सर्व घटकांना जोडण्याचे काम आम्ही करीत आहोत. भाजपच्या लबाडीचा पर्दाफाश करण्याचे कामही राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी करीत आहेत. - संतोष पवार, कार्याध्यक्ष, राष्ट्रवादी

विधानसभा मतदारसंघातील मित्रपक्षांच्या कार्यालयांत काय दिसले ?

  • १. शहर उत्तर : राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष भारत जाधव, कार्याध्यक्ष संतोष पवार, युवक अध्यक्ष जुबेर बागवान यांच्यासह आजी-माजी पदाधिकाºयांवर जबाबदारी आहे. 
  • २. मंगळवेढा : ऐन निवडणुकीत शहराध्यक्ष, तालुका अध्यक्षाने राजीनामा दिला. सध्या राहूल शिंदे, राजेंद्र हजारे, लतिफ तांबोळी, भारत पाटील यांच्या माध्यमातून काम सुरू आहे. 
  • ३.शहर मध्य. : जाधव, पवार यांच्यासह नगरसेवक किसन जाधव, सुनिता रोटे, युवक अध्यक्ष बबलू खुणे यांच्यासह सर्व आजी-माजी पदाधिकारी काम करीत आहेत. 
  • ४. दक्षिण सोलापूर : माजी सभापती दादाराव कोरे, राज साळुंखे, विलास लोकरे, अमीर शेख, सागर चव्हाण यांच्यासह नव्या कार्यकर्त्यांनी प्रचार यंत्रणा सांभाळली आहे. 
  • ५.अक्कलकोट: तालुक्यातील राष्ट्रवादी विस्कळीत झाली आहे. या परिस्थितीतही दिलीप सिध्दे, तालुकाध्यक्ष बंदेवनाज खोरगू यांनी प्रचार यंत्रणा लावली आहे.
  • ६. मोहोळ : माजी आमदार राजन पाटील, झेडपी सदस्य बाळराजे पाटील, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्यराणा पाटील यांनीच प्रचार यंत्रणा लावली आहे. 
टॅग्स :SolapurसोलापूरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकsolapur-pcसोलापूरSushilkumar Shindeसुशीलकुमार शिंदेSharad Pawarशरद पवार