मंगळवेढ्यात राष्ट्रवादीचे पदाधिकारी बदलले; जाणून घ्या कुणाची कोणत्या पदावर झाली निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2021 08:56 IST2021-10-02T08:56:22+5:302021-10-02T08:56:56+5:30

मंगळवेढा राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पदी प्रा पी बी पाटील , शहराध्यक्षपदी चंद्रशेखर कोंडुभैरी तर जिल्हा उपाध्यक्षपदी तानाजी काकडे : कार्याध्यक्ष पदी बसवराज पाटील आगामी निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर पक्षात नव्याने निवडी

NCP office bearers changed on Tuesday; Find out who was elected to which position | मंगळवेढ्यात राष्ट्रवादीचे पदाधिकारी बदलले; जाणून घ्या कुणाची कोणत्या पदावर झाली निवड

मंगळवेढ्यात राष्ट्रवादीचे पदाधिकारी बदलले; जाणून घ्या कुणाची कोणत्या पदावर झाली निवड

मंगळवेढा : आगामी निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर मंगळवेढा शहर व तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महत्वाच्या निवडी जाहीर करण्यात आल्या आहेत. तालुकाध्यक्ष पदी प्रा पी बी पतील , शहराध्यक्षपदी चंद्रशेखर कोंडुभैरी तर जिल्हा उपाध्यक्षपदी माजी सभापती तानाजी काकडे, कार्याध्यक्षपदी बसवराज पाटील यांची निवड करण्यात आली आहे.

मंगळवेढा तालुक्यात दामाजी कारखाना, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीसह विविध सहकारी संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर पक्ष संघटन मजबूत होण्याच्या दृष्टीने तालुका व शहर निवडीत फेरबदल करीत नव्याने पदाधिकारी निवड केली आहे. राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष बळीराम साठे व कार्यकारी जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी शुक्रवारी मंगळवेढा शहर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महत्वाच्या निवडी जाहीर करून नूतन पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.

यावेळी पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष लतिफ तांबोळी, राजेंद्र हजारे, मानाजी माने, राहुल शहा, रामेश्वर मासाळ आदी मान्यवर उपस्थित होते नूतन पदाधिकारी खालील प्रमाणे : भारत बेदरे (जिल्हा सरचिटणीस) मुझम्मिल काझी (जिल्हा सहसचिव) प्रकाश भिवाजी पाटील (मंगळवेढा तालुका अध्यक्ष) चंद्रशेखर जयनारायण कोंडूभैरी ( मंगळवेढा शहराध्यक्ष) बसवराज रामगोंडा पाटील -(तालुका कार्याध्यक्ष ) नागन्नाथ दगडू राऊत -(शहर कार्याध्यक्ष) तानाजी आप्पा काकडे ( जिल्हा उपाध्यक्ष) आदी निवडी करण्यात आल्या. नूतन पदाधिकारी यांचे सत्कार करण्यात आले. 

Web Title: NCP office bearers changed on Tuesday; Find out who was elected to which position