शासकीय समित्यांवर राष्ट्रवादी 60 टक्के अन्‌ सेना-काँग्रेसला 20-20 टक्के वाटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 12:03 PM2021-06-23T12:03:19+5:302021-06-23T12:03:25+5:30

पालकमंत्र्यांची माहिती :  सेनेच्या शिष्टमंडळाने केली प्रत्येकी ३० टक्के मागणी

The NCP has 60 per cent share in the governing committees and the Sena-Congress has 20 per cent share | शासकीय समित्यांवर राष्ट्रवादी 60 टक्के अन्‌ सेना-काँग्रेसला 20-20 टक्के वाटा

शासकीय समित्यांवर राष्ट्रवादी 60 टक्के अन्‌ सेना-काँग्रेसला 20-20 टक्के वाटा

Next

करमाळा : सोलापूर जिल्ह्यातील विविध शासकीय समित्यांवरील पदाधिकाऱ्यांच्या निवडीचा फॉर्म्युला ठरलेला असून, राष्ट्रवादी काँग्रेस ६० टक्के तर शिवसेनाकाँग्रेस प्रत्येकी २० टक्के पदांवर निवडी करण्याचे ठरले असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. दरम्यान, सेनेच्या शिष्टमंडळाने सेना व काँग्रेस ३०-३० टक्केची मागणी करण्यात आली.

करमाळा तालुक्याच्या सीमेवरील मदनवाडी ग्रामपंचायतीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने पालकमंत्री आले होते. येथे शिवसेनेच्या वतीने उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी राज्यात आघाडी सरकार स्थापन होऊन दीड वर्षाहून अधिक कालावधी झालेला असताना राज्यातील बोर्ड, महामंडळ व विविध शासकीय समित्यांचे पदाधिकारी व सदस्य अद्याप निवडले गेले नाहीत. सोलापूर जिल्ह्यात निवडी करताना शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना महत्त्वाची पदे द्यावीत, अशी मागणी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांना भेटून निवेदनाव्दारे केली. यावेळी त्यांनी ही माहिती दिली. 

पालकमंत्री भरणे यांनी जिल्ह्यातील विविध शासकीय समित्यांमध्ये सरकारमध्ये असलेल्या तिन्ही  पक्षांतील कार्यकर्त्यांना स्थान देण्यात येणार आहे. यात राष्ट्रवादी काँग्रेस ६० टक्के तर शिवसेना व काँग्रेस पक्षाला २०-२० अशी ४० टक्के जागा देण्याचे ठरलेले आहे, असे सांगितले. 
यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख महेश चिवटे यांनी शिवसेना व काँग्रेसला प्रत्येकी ३० टक्के समित्यांवर संधी द्यावी, अशी मागणी केली. 

दीपक साळुंके समन्वय समितीचे प्रमुख 
सोलापूर जिल्ह्यातील विविध शासकीय समित्यांवरील कार्यकर्त्यांच्या निवडीबाबत राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व काँग्रेस या तिन्ही पक्षांकडून याद्या घेण्याची जबाबदारी समन्वय समिती प्रमुख म्हणून सांगोल्याचे माजी आमदार दीपक साळुंके यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. 

- पालकमंत्र्यांनी सूचित केल्याप्रमाणे जर २० टक्के फॉर्म्युल्यानुसार तालुक्यात शिवसेना, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमधून कोणाची वर्णी लागेल यावरही आता चर्चा झडू लागल्या आहेत. दरम्यान २० टक्क्यांऐवजी ३० टक्के वाटा मिळावा या सेनेच्या मागणीला राष्ट्रवादी कितपत प्रतिसाद देणार याकडेही लक्ष वेधले आहे.

Web Title: The NCP has 60 per cent share in the governing committees and the Sena-Congress has 20 per cent share

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.